– आदित्य गुंड
१. मैदानावर येताना राफा कायम एक रॅकेट हातात घेऊन येतो.
२. मैदानावर आल्यानंतर आपली किट बॅग ठेवली की स्पर्धेचे ओळखपत्र बेंचवर ठेवताना चेहऱ्याची बाजू वर राहील अशा रीतीने ते ठेवतो.
३. कोर्टवर हालचाल करताना कोर्टच्या लाईन्स ओलांडण्याची वेळ आली तर राफा फक्त उजवा पाय पुढे टाकूनच लाईन ओलांडतो. शक्य असल्यास तो या लाईन्सवर पाय ठेवत नाही.
४. सामन्याला तयार होताना राफा बऱ्याचदा उड्या मारत आपले जॅकेट काढून ठेवतो.
५. नाणेफेकीला जाण्याअगोदर तयार होण्यासाठी तो बराच वेळ घेतो. नाणेफेकीसाठी बऱ्याचदा त्याने पंच आणि प्रतिस्पर्ध्याला थांबवून ठेवल्याची उदाहरणे आहेत. हा त्यातलाच एक व्हिडीओ.
६. नाणेफेकीसाठी नेटजवळ उभे असताना राफा कायम उड्या मारत असतो.
७. नाणेफेकीनंतर बेसलाईनकडे जाताना राफा कायम पळत जातो.
८. सर्व्हिस करण्यागोदर चेंडू किमान १२-१५ वेळा आपटण्याची राफाला सवय आहे. काही वेळेस तो १५ हून जास्त वेळा चेंडू आपटतो आणि मगच सर्व्हिस करतो. त्याच्या ह्या सवयीमुळे खेळाला होणाऱ्या उशिरामुळे त्याला पंचांकडून ताकीदही मिळाली आहे.
९. सर्व्हिस करण्याअगोदर राफा चेहऱ्यावर आलेले आपले केस कानामागे सरकावतो आणि मगच सर्व्हिस करतो. हे करताना तो खांद्यावरून आपला टीशर्टदेखील सतत एकसारखा करत असतो.
१०. राफाची सगळ्यांना माहित असलेली आणि हास्यास्पद सवय म्हणजे पार्श्वभागाकडे हात नेऊन आपली शॉर्ट व्यवस्थित करणे. संपूर्ण सामन्यात अनेकदा राफा हे करत असतो.
११. प्रत्येक सामन्याअगोदर राफा अतिशय थंड पाण्याने आंघोळ करतो. यामुळे आपल्याला सामन्यासाठी तयार व्हायला मदत होते, आपल्या शरीरातील ऊर्जा कार्यान्वित होते असे राफा म्हणतो.
१२. प्रत्येक पॉइंटनंतर राफा बॉलबॉयकडून टॉवेल घेऊन घाम पुसतो.
१४. विश्रांती दरम्यान एनर्जी जेल खाताना तो कायम जेलचे पाऊच चारच वेळा दाबतो.
१३. दोन गुणांच्या मध्ये विश्रांती घेत असताना राफा अगोदर एनर्जी ड्रिंक पितो आणि त्यानंतर पाणी पितो. या क्रमामध्ये कधीच बदल होत नाही. एनर्जी ड्रिंक आणि पाणी पिऊन झाल्यानंतर राफा त्या दोन बाटल्या अतिशय काळजीपूर्वक आधी होत्या त्याच जागी, जशा होत्या तशाच ठेवतो. सामन्यादरम्यान ज्या पद्धतीने गोष्टी हव्यात तशाच त्या मी ठेवतो. यात कुठलीही अंधश्रद्धा नाही असे राफा सांगतो.
१४. दोन गुणांच्या मधल्या वेळेत आपल्या बेंचकडे जाताना नेटजवळ आल्यावर राफा आधी आपल्या प्रतिस्पर्ध्याला जाऊ देतो आणि मगच स्वतःच्या बेंचकडे जातो.
१५. विश्रांती नंतर पुन्हा कोर्टवर जाताना राफा आधी आपल्या प्रतिस्पर्ध्याला कोर्टवर जाऊ देतो. मगच तो कोर्टवर जातो.
१५. घामाने ओला झालेला आपला टीशर्ट काढून नवा टीशर्ट घालताना राफा कायमच ४-५ सेकंद जास्त वेळ घेतो. कायम! का ते सांगण्याची गरज नाहीच.