---Advertisement---

“त्याला बाद करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील”, दिग्गजाचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घरचा आहेर

On: बुधवार, नोव्हेंबर 25, 2020 11:41 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या बहुचर्चित क्रिकेट मालिकांना २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका होईल. दौऱ्याच्या अखेरीस, चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. भारतीय कर्णधार विराट कोहली हा कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळून; पितृत्व रजेवर भारतात परतेल. या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

विराटच्या तंत्रात कसलीही कमतरता नाही

‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत‌ जेसन गिलेस्पी याने भारतीय कर्णधार विराट कोहलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. गिलेस्पी म्हणाला, “ऑस्ट्रेलियन गोलंदाज विराटला स्वस्तात बाद करू शकत नाहीत. विराटच्या तंत्रात लहानशीही कमजोरी दिसत नाही. विराटला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना कठोर मेहनत घ्यावी लागेल. ऑस्ट्रेलियन गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत राहिले तरी, विराटला फसवण्यासाठी त्यांना संयम बाळगावा लागेल.”

विराट थांबला तर भारत मोठी धावसंख्या उभारेल

विराटच्या मोठ्या खेळ्या करण्याच्या क्षमतेविषयी बोलताना गिलेस्पी म्हटला, “विराटला लवकरात लवकर बाद केले तरच, ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाला रोखू शकतो. विराट मैदानावर उभा राहिला तर, भारत नक्कीच मोठी धावसंख्या उभारेल. मात्र, कसोटी मालिकेत विराटचा जास्त खेळ पाहायला मिळणार नाही, याची खंत राहील.”

भारतीय गोलंदाजांचे केले कौतुक

गिलेस्पीने विराटसोबतच भारतीय वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांची त्याने खास प्रशंसा केली. भारतीय गोलंदाजांबद्दल म्हणाला, “बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज बनला आहे. शमीने देखील स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेला दिसून येतो. त्याची गोलंदाजी पाहणे नेहमी आनंददायी असते. वेग आणि स्विंग यांचा त्यांनी अचूक मेळ साधला आहे. स्टीव स्मिथ व मार्नस लाबुशेन यांच्यासमोर हे दोघे आव्हान निर्माण करतील.”

मर्यादित षटकांच्या मालिका संपल्यानंतर, ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीने ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ ला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यानंतर विराट मायदेशी परतले. त्यानंतर अजिंक्य रहाणे भारताचे कर्णधारपद भूषवेल. भारतीय संघ ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’चा गतविजेता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“मी देशासाठी काय केले हे जगाला माहीत आहे”, मलिंगा झाला भावूक

ब्रेंकिंग ! महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन

“आमचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार” ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने फुंकले रणशिंग

ट्रेंडिंग लेख –

ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज

भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---