शुक्रवारी (दि. 23 जून) बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय वनडे आणि कसोटी संघाची घोषणा केली. यापैकी एकाही संघात देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या सरफराज खान याला संधी न दिल्यामुळे निवडकर्त्यांवर निशाणा साधला गेला. त्याला संघात न घेण्यामागे फिटनेस आणि शिस्तीचे कारण देण्यात आले. मात्र, मुंबई क्रिकेटशी संबंधित व्यक्तींनी या गोष्टी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यांनी या दाव्यांमध्ये सत्यता नसल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, सरफराजला त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा करण्याची आणि मैदानाच्या आत-बाहेर जास्त शिस्तीत राहण्याची गरज आहे.
सरफराजविषयी मोठा खुलासा
मुंबई क्रिकेटशी संबंधित व्यक्तींनी सरफराज खान (Sarfaraz Khan) याचा बचाव केला. सरफराजने मागील हंगामात दिल्लीविरुद्ध शतक केल्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने बोट दाखवत आक्रमक सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या कृतीला चुकीचे म्हटले गेले होते. सरफराजच्या अशा कृतीला त्यावेळी स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या निवडकर्त्यांपैकी एकावर कटाक्ष मानले गेले.
खरंच स्टेडिअममध्ये उपस्थित होते का चेतन शर्मा?
सरफराजच्या जवळच्या व्यक्तीने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “दिल्लीत रणजी सामन्यादरम्यान सरफराजचा जल्लोष त्याच्या सहकारी आणि प्रशिक्षक अमोल मजूमदार यांच्यासाठी होते. मजूमदार यांनीही सरफराजच्या शतकीय खेळी आणि जल्लोषाचे कौतुक टोपी काढून केले होते. त्यावेळी स्टेडिअममध्ये निवडकर्ते चेतन शर्मा नव्हते, तर सलील अंकोला होता. सरफराजने संघाला दबावाच्या स्थितीतून बाहेर काढले होते आणि हे सेलिब्रेशन त्यासाठीच होते.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, “आपल्या ड्रेसिंग रूमच्या दिशेने ईशारा करत मोकळेपणाने आनंद व्यक्त करणेही चुकीचे आहे का?”
चंद्रकांत पंडित प्रकरणावरून उठला पडदा
सरफराजबाबत असेही म्हटले जाते की, मागील वर्षी मध्यप्रदेशचे तत्कालीन प्रशिक्षक चंद्रकांत पंडित हे त्याच्या वर्तनामुळे खुश नव्हते. मात्र, सरफराजच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, पंडित यांनी नेहमीच त्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “चंदू सर त्याला मुलाप्रमाणे मानतात. ते सरफराजला तेव्हापासून ओळखतात, जेव्हा तो 14 वर्षांचा होता. ते नेहमीच सरफराजचे कौतुक करतात. ते सरफराजवर कधीच चिडणार नाहीत.”
सरफराजच्या जवळच्या व्यक्तींना हे जाणून घ्यायचे आहे की, धावांचा पाऊस पाडूनही त्याला भारतीय संघात दुर्लक्षित का केले गेले? भारतीय संघात फिटनेस मापदंड 16.5 (यो यो टेस्ट) आहे. त्याने हे पूर्ण केले आहे. जिथपर्यंत क्रिकेट फिटनेसचा विषय आहे, तर त्याने अनेकदा दोन दिवस फलंदाजी केली आहे आणि त्यानंतर दोन दिवस क्षेत्ररक्षणही केले आहे. (domestic cricketer sarfaraz khan insulted chetan sharma big disclosure on viral aggressive celebration)
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीपूर्वी कांगारुच्या दोन धुरंधरांना पाँटिंगचा मोलाचा सल्ला, वाचा काय म्हणाला माजी कर्णधार
गावसकरांचे विधान वाढवेल ‘माही’च्या चाहत्यांचं टेन्शन! म्हणाले, धोनी नाही ‘हा’ आहे खरा Captain Cool