---Advertisement---

फारुख इंजिनियरनी केलेल्या ‘त्या’ टीकेवर अनुष्का शर्मा भडकली, दिले हे प्रतिउत्तर

On: शुक्रवार, नोव्हेंबर 1, 2019 12:39 PM
---Advertisement---

मागील अनेक वर्षांपासून भारताच्या सामन्यांना जर भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा उपस्थित राहिली तर तिला अनेकदा ट्रोल करण्यात येते.

नुकतेच भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांनी एका मुलाखतीत भारतीय संघाचे निवडकर्ते विश्वचषकादरम्यान अनुष्काला चहा नेऊन देत होते असे म्हणत टीका केली होती.

इंजिनियर यांच्या या भाष्यानंतर अखेर अनुष्काने मौन सोडत सोशल मीडियावर एक प्रसिद्धीपत्रक जाहिर केले आहे. यामध्ये तिने तिच्यावर झालेल्या अनेक आरोपांबद्दल भाष्य केले आहे.

अनुष्काने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘मी नेहमीच खोट्या वृत्तांबद्दल मौन ठेवले. अशाच पद्धतीने मी 11 वर्षे माझी कारकिर्द सांभाळली आहे. पण आता मौन सोडत आहे.’

‘ज्यावेळी विराटच्या कामगिरीसाठी माझ्यावर आरोप करण्यात आले आणि अनेकदा भारतीय क्रिकेटमधील अनेक निराधार गोष्टींसाठीही मला जबाबदार धरण्यात आले, पण मी शांत राहिले. माझे नाव बनावट गोष्टींमध्ये वापरले गेले आणि असा दावा केला गेला की मी भारतीय संघाच्या नेहमी बरोबरच असते आणि निवड प्रक्रियेवर प्रभाव पाडत आहे. पण तरीही मी शांत होते.’

‘तसेच मला जास्त प्राधान्य दिले जात आहे किंवा मी माझ्या पतीबरोबर परदेश दौर्‍यावर माझा जास्त वेळ कसा घालवला आहे, यासाठी माझ्या नावाचा चुकीचा वापर होत आहे. पण कोणीही याबद्दल बोर्डाकडून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मी नेहमीच नियमांचे पालन केले आहे. पण त्यानंतरही मी शांत बसले.’

‘मी सामन्यांसाठी आणि प्रवासाचे तिकीट्स स्वत: काढते. मला उच्च आयुक्तांच्या पत्नीनेच भारतीय संघाच्या ग्रृप फोटोमध्ये उभे राहण्यास सांगितले होते. त्यावरुन मोठा वाद झाला आणि मला जबाबदार धरण्यात आले. बोर्डाकडूनही याचे स्पष्टीकरण देण्यात आले. पण तरीही मी मौन ठेवले.’

‘आता अखेर निवडकर्ते विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान मला चहा देत होते हा आरोप करण्यात आला. मी विश्वचषकादरम्यान एका सामन्यासाठी आले होते आणि फॅमिली बॉक्समध्ये बसले होते, निवडकर्त्यांच्या बॉक्समध्ये नाही.’

‘जर तूम्हाला निवड समीतीवर टीका करायची असेल तर जरूर करा पण त्यामध्ये माझे नाव आणू नका. मी कोणालाही अशा चर्चामध्ये माझे नाव आणण्याची परवानगी देत नाही.’

अनुष्काने अखेर म्हटले आहे की ‘असे पहिल्यांदाच नाही तर अनेकदा माझ्यावर आरोप झाले आहेत. पण मी आज माझे मौन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी आज बोलण्याचा निर्णय घेतला कारण कोणाचेही मौन ही त्यांची कमजोरी असू शकत नाही.’

‘पुढच्यावेळी कोणतीही गोष्ट बोलताना सत्य शोधून आणि पुराव्यासकट बोला आणि मला यापासून वेगळे ठेवा. मी माझे आयुष्य आणि कारकीर्द अतिशय प्रतिष्ठेने बनविली आहे आणि त्याची मी कशासाठीही तडजोड करणार नाही. कारण मी एक स्वतंत्र स्त्री असून एका क्रिकेटपटूची पत्नी आहे.’

त्याचबरोबर अनुष्काने या प्रसिद्धीपत्रकात शेवटच्या ओळीमध्ये म्हटले आहे की ‘आणि रेकॉर्डसाठी मी कॉफी पिते.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---