क्रिकेट हा खेळ खूप रोमांचक मानला जातो. बऱ्याचदा मैदानावर खेळाडूंमध्ये वातावरण तापते, बाचाबाची देखील होते. काही वाद खूप वाढतात, काही तिथल्या तिथे संपतात. तसे स्लेजिंग काही क्रिकेटविश्वासाठी नवीन नाही. अगदी इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतही हा प्रकार जगासमोर आला. असेच काहीसे घडले वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या दुसऱ्या कसोटीत.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना जमैका येथील मैदानावर खेळला गेला. या सामन्यात यजमान संघाचे फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर असहाय्य दिसत होते, विशेषत: शाहीन आफ्रिदीने तर सुरुवातीपासून वेस्ट इंडिजच्या फलंदाजावर अंकुश ठेवले होते. सामन्यादरम्यान त्याच्यासोबत एक मजेदार घटना घडली. शाहीन आफ्रिदी वेस्ट इंडिजचा खेळाडू जाडेन सीलजला स्लेजिंग करताना दिसला.
१९ वर्षीय जेडेन सील अकराव्या क्रमांकावर वेस्ट इंडीजसाठी फलंदाजीसाठी आला होता. तेव्हा शाहीन आफ्रिदीने त्याच्यासोबत असे कृत्य केले होते. शाहीन आफ्रिदीला असे करताना पाहून पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यष्टीच्या मागून त्याला बोलला, ‘तो 19 वर्षांचा आहे, त्याला स्लेज करू नकोस.’ यष्टीवरील माईक्समध्ये हा गमतीदार प्रसंग रेकॉर्ड झाला आहे. काहींनी याचा व्हिडिओही सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.
https://twitter.com/m_mustafa146/status/1429928781247045637?s=20
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाने चमकदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला 109 धावांनी नमवत सामना जिंकला. पाकिस्तानच्या विजयाचा नायक वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी राहिला. त्याने पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात चार बळी घेतले. यासह दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. वेस्ट इंडिजने पहिला कसोटी सामना एका विकेटने जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सवरील शतकी भागिदारी दरम्यान रहाणे-पुजारामध्ये काय झाले होते बोलणे? उपकर्णधाराने केला खुलासा
“आर अश्विन या आठवड्यातही खेळला नाही तर मला खूप आनंद होईल”