---Advertisement---

लॉर्ड्सवरील शतकी भागिदारी दरम्यान रहाणे-पुजारामध्ये काय झाले होते बोलणे? उपकर्णधाराने केला खुलासा

Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. लाॅर्ड्सवरील कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या मार्गावर होता, मात्र संघाच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर भारताने हा सामना १५१ धावांनी जिंकला. सामन्याच्या पहिल्या डावानंतर संघ २७ धावांनी मागे होता. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने केवळ ५५ धावांमध्ये ३ विकेट गमावल्या होत्या. मात्र, दोन अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पार पाडली. यानंतर आता अजिंक्य रहाणेने सांगितले आहे की, भागिदारीदरम्यान त्याचे पुजारासोबत काय बोलणे झाले?

चेतेश्वर पुजाराचे प्रदर्शन संघासाठी महत्वपूर्ण
अजिंक्य रहाणेला त्यांच्या दोघांमधील चर्चेविषयी विचारल्यानंतर त्याने सांगितले की, “चर्चा फक्त लक्ष्याविषयी होत होती आणि आम्हाला तिथून डावाला पुढे घेऊन जायचे होते. आपण नेहमी चर्चा करतो की चेतेश्वर हळू खेळतो. मात्र त्याचा डाव आपल्यासाठी महत्वपूर्ण होता. तो २०० चेंडू खेळला. आम्ही एकमेकांना साथ दिली. चेतेश्वर आणि मी खूप दिवसांपासून एकत्र खेळत आहोत,.आम्हाला माहित आहे दबावाला कसे सामोरे जायचं आहे, निश्चित परिस्थितीचा सामना कसा करायचा आहे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्याविषयी आम्ही चर्चा करत नाही.”

भारतीय संघाला हेडिंग्ले मैदानात खेळण्याचा अनुभव नाही
सध्याच्या भारतीय संघातील एकही खेळाडू आजपर्यंत हेडिंग्ले मैदानावर खेळलेला नाही. रहाणेने याबाबत बोलताना सांगितले, संघ या गोष्टीविषयी चिंतेत नाही. तो म्हणाला, “हे आमच्यापुढील आव्हान नाहीये. जेव्हा तुम्ही लयीत असता तेव्हा त्या लयीला कायम राखायचे असते. यासाठी स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. आम्हाला हेडिंग्लेमध्ये खेळायला काहीच अडचण नाही.” इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून सुरू होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आफ्रिदीच्या गोलंदाजीपुढे विंडीजचा थरथराट, दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा १०९ धावांनी विजय; मालिका बरोबरीत

विराटसेना हेडिंग्लेवर करणार ‘पदार्पण’, आजपर्यंत अशी राहिलीये या मैदानावरील भारत-इंग्लंडची कामगिरी

“कर्णधार म्हणून विराटपेक्षा धोनी जास्त आवडतो, तो अजित यांच्यासारखा वाटतो”, वाडेकरांच्या पत्नीकडून कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---