राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने 2024च्या टी20 विश्वचषकावर वर्चस्व गाजवले. 13 वर्षांनंतर भारताने 2024चा टी20 विश्वचषक जिंकला. पण द्रविडसाठी यावेळचा खूप भावनिक क्षण होता. असे द्रविडने सांगितले आहे. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर, 30 सेकंदांचा एक क्षण आला, ज्याची आठवण करून द्रविड लाजतो. द्रविडने एका कार्यक्रमात याचा खुलासा आहे.
भारताने टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली होती. राहुल द्रविडने (Rahul Dravid) ज्या प्रकारे ट्रॉफी हातात घेऊन सुमारे 30 सेकंद सेलिब्रेशन केले, त्याला ‘इंदिरानगरचा गुंडा’ म्हटले जाऊ लागले होते. सीएटी पुरस्कार सोहळ्यात द्रविडला या सेलिब्रेशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, “मी पुन्हा पुन्हा याची उत्तरे देऊन थकलो आहे. मला अजूनही त्या 30 सेकंदांसाठी (सेलिब्रेशन) लाज वाटते. तो माझा शेवटचा दिवस होता हे चांगले होते (प्रशिक्षक म्हणून).”
What’s #RahulDravid up to after coaching Team India? 🤔
Watch as the former Indian head coach talks about the story behind his unexpected celebration and shares his future plans! 😮👏🏼
Watch the Full episode – CEAT Cricket Awards on YouTube channel pic.twitter.com/sVgO1ak3RV
— Star Sports (@StarSportsIndia) September 3, 2024
राहुल द्रविडला (Rahul Dravid) पुढे विचारण्यात आले की जर बायोपिक बनला तर कोणी भूमिका साकारली पाहिजे, त्यावर द्रविड म्हणाला, “मला माझी भूमिका स्वत: करायला आवडेल, फक्त बायोपिकसाठी पैसे असावेत (हसत).”
द्रविडने भारतासाठी 164 कसोटी, 344 एकदिवसीय आणि 1 टी20 सामना खेळला आहे. 164 कसोटी सामन्यांमध्ये 13,288 धावा केल्या, तर 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,889 धावा केल्या आहेत. द्रविडने भारतासाठी केवळ एकच टी20 सामना खेळला. त्यामध्ये त्याने 31 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्रविडने 48 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
निवडकर्ते अजय रात्रा यांना किती पगार मिळणार? मुख्य निवडकर्त्याला बीसीसीआय देते ‘इतके’ वेतन
दातानं चावा घेणारा खेळाडू निवृत्त, मेस्सी-नेमारशी आहे खास नातं!
कोरोनात आई गेली, 2 वर्षांपूर्वी वडिलही वारले; अंडर 19 टीमच्या कर्णधाराची कहाणी करेल भावूक