---Advertisement---

द्रविडची माणुसकी! टॅक्सी सोडून पाकिस्तानी खेळाडूंशी रस्त्यावर चर्चा केली, वाचा ‘त्या’ घटनेबद्दल

On: शुक्रवार, जून 11, 2021 12:10 AM
---Advertisement---

राहुल द्रविड एक महान क्रिकेटपटू तसेच एक चांगला माणूस म्हणून ओळखला जातो. राहुल द्रविडपूर्वी सहकारी खेळाडूंना तसेच विरोधी खेळाडूंना देखील मदत करत. निवृत्तीनंतर देखील तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे. त्याच्या माणुसकीचा असाच एक किस्सा पाकिस्तानचा माजी अष्टपैलू यासिर अराफत याने सांगितला आहे. अराफतने एका भारतीय युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.

द्रविडने रस्त्याच्या कडेला उभे राहून चर्चा केली
यासिर अराफत याने नुकतीच एका भारतीय युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये त्याने अनेक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. राहुल द्रविड विषयीची एक आठवण सांगताना अराफत म्हणाला, “राहुल द्रविड माणूस म्हणून एक आदर्श आहे. २०१४ मध्ये तो लॉर्ड्सवर एका सामन्यात समालोचन करण्यासाठी आला होता. सामना संपल्यानंतर जाण्यासाठी त्याने टॅक्सी बुक केलेली. तो टॅक्सीत बसणार इतक्यात मी त्याला राहुल भाई असा आवाज दिला. त्याने ती टॅक्सी सोडत अक्षरशः त्या रस्त्याच्या बाजूला उभे राहात माझ्याशी १०-१५ मिनिटे चर्चा केली. त्याने माझ्या कुटुंबाची ख्यालीखुशाली देखील विचारली. त्यावेळी झालेला आनंद मी शब्दात सांगू शकत नाही.”

द्रविड अराफात यांच्या विशेष नाते
राहुल द्रविड आणि यासिर अराफत यांच्यात एक खास नाते आहे. अराफत याने भारताविरुद्ध २००७ मध्ये कसोटी पदार्पण केले होते आणि त्याचा पहिला बळी राहुल द्रविड होता. आपल्या पहिल्याच डावात त्याने पाच बळी मिळविलेले. त्या विषयाची आठवण सांगताना अराफत म्हणाला, “राहुल द्रविडला बाद करणे माझ्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी आहे. तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.”

यासिर अराफत याने पाकिस्तानकडून ३ कसोटी सामने खेळताना ९ बळी मिळवले होते. वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये त्याने पाकिस्तानसाठी १६ व वनडे क्रिकेटमध्ये ४ बळी मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

श्रीलंका दौऱ्यासाठी २४ वर्षीय पुणेकर ऋतूराज गायकवाडची टीम इंडियात निवड; पाहा कशी राहिली आजपर्यंतची कामगिरी

बिग ब्रेकिंग! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, पुणेकर ऋतूराज गायकवाडला मिळाले स्थान; पाहा कोण झालंय कर्णधार

‘मला २००७ टी२० विश्वचषकावेळी कर्णधारपदाची आशा होती, पण धोनी कर्णधार झाला’, युवराजचा खळबळजनक खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---