शुक्रवारी (७ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर केली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात प्रमुख्याने २० खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तर ४ राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. त्यातही कुलदीप यादव या फिरकीपटूला भारतीय संघात स्थान न मिळल्याबद्दलही बरीच चर्चा झाली. २०१९ विश्वचषकापासून अनेकदा कुलदीप यादवकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता त्याच्याबद्दल ‘द वॉल’ राहुल द्रविडने भाष्य केले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या भारतीय संघाबद्दल बोलताना द्रविड म्हणाला, ‘संघ समतोल आहे. संघात २० खेळाडू आहेत. फक्त अजून एक खेळाडू या संघात स्थान मिळवू शकत होता. तो म्हणजे कुलदीप यादव. पण यापासून लांब राहिला. तसेच नुकजीकच्या काळात अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने केलेल्या कामगिरीमुळे त्यांना आपल्या संघाचा समतोल कसा असावा याबाबत त्यांचे विचार स्पष्ट असावेत.’
द्रविड पुढे म्हणाला, ‘अश्विन आणि जडेजा त्यांच्या फलंदाजीतूनही योगदान देतात आणि त्यांच्यासारखेच अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे देखील आहेत. त्यांना कोणत्या दिशेने जायचे आहे याबाबत ते स्पष्ट आहेत. त्यांच्यामुळे संघाच्या फलंदाजीला खोली मिळते. संघाकडे बघून मला वाटते त्यांना इथून निघण्यापूर्वीच अंतिम ११ जणांचा सर्वोत्तम संघ कसा असेल याबाबत माहिती आहे.’ कोविड-१९मुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या लाईव्ह एड इंडिया ट्रस्टने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये द्रविड बोलत होता.
कुलदीपने एकूण ७ कसोटी सामने भारतासाठी आत्तापर्यंत खेळले असून २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला
महत्त्वाच्या बातम्या –
कोहली-रोहितच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौर्यावर कोण करणार नेतृत्व? ‘हे’ आहेत भारताचे पर्याय
आयसीसीच्या मोठ्या पुरस्कारामध्ये बाबर आझमने मारली बाजी; ‘या’ क्रिकेटपटूंना टाकले मागे
पॅट कमिन्सने नजरचुकीने मयंती लँगरऐवजी केले मयंक अगरवालला केले टॅग, मग मिळाला ‘असा’ रिप्लाय