क्रिकेटमध्ये डिसिजन रिव्हियू सिस्टिम (डीआरएस) आल्यानंतर खेळाडूंना बऱ्याच प्रमाणात मदत मिळाली आहे. या प्रणालीमुळे खेळाडूंना पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार मिळाला, जो बऱ्याच ठिकाणी खेळाडूंसाठी वरदान ठरले. फक्त आंतरराष्ट्रीयच नव्हे तर फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये देखील डीआरएसला महत्व प्राप्त झाले आहे. अशातच बांगलादेश प्रीमिअर लीगच्या एका निर्णयामुळे लोक हैराण झाले आहेत. बीपीएलचा नवा हंगाम 6 जानेवारीपासून सुरु होणार आहे. बीपीएल 2023च्या साखळी सामन्यांमध्ये डीआरएसचा वापर करता येणार नाही.
बीपीएलच्या नियामक मंडळाचे सचिव इस्माईल हैदर मलिक (Ismail Haider Mallick) यांनी खुलासा केला आहे की बांगलादेश प्रीमिअर लीगबरोबरच त्यावेळी अजून दोन फ्रेंचायझी क्रिकेट स्पर्धा सुरु असतील. त्यामुळे पूर्ण हंगामासाठी डीआरएलची उपलब्धता कठीण असेल. माध्यंमांशी बोलताना मोलिक म्हणाले की,”आपल्याजवळ अंतिम सामन्याबरोबरच बाद फेरीसाठी डीआरएस उपलब्ध असणार आहे. आम्ही डीआरसाठी वैकल्पिक पर्यायाचा विचार करत आहोत. आपल्याजवळ यावेळी डीआरएसचे सुधारीत वर्जन असणार आहे.” मोलिक पुढे म्हणाले की, “हॉक आय तंत्रज्ञान सध्या उपलब्ध नाहीये. वर्च्युअल आय फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये वापरतात. जगभरात अनेक ठिकाणी सामने खेळवले जात आहेत. हॉकआय द्विपक्षिय मालिकेत वापरण्यात येणार असल्याने आपल्याला बाद फेरीतच याचा वापर करता येऊ शकतो.” बीपीएल या स्पर्धेत एकूण सात संघांमध्ये राऊंड-रॉबिन पद्धतीने सामने खेळवले जातील, ज्यात टॉप-4 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
या हंगामातील सर्व 46 सामने तिन ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. या स्पर्धेतील बाद फेरीचे चारही सामने ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियम येथे खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 16 फेब्रुवारी या दिवशी खेळवला जाणार आहे. शेर-ए-बांगलादेश स्टेडियमबरोबरच सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि चट्टोग्राम येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवले जातील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला आता सुट्टीच नाही! 2023मध्ये आशिया चषक, वर्ल्डकपसह खेळणार तब्बल ‘इतके’ सामने
पंतबाबत मोठी अपडेट! उपचारांचा चांगला परिणाम, रोहितही बोलला डॉक्टरांशी