---Advertisement---

टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच होणार डीआरएसचा वापर, प्रत्येक संघाला मिळणार ‘इतके’ रिव्ह्यू

---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून पुरुषांचा टी -२० विश्वचषक सुरु होणार आहे. ही स्पर्धा काही नविन नियमांनुसार खेळली जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच पुरुषांच्या टी२० विश्वचषकात डीआरएस प्रणाली वापरली जाईल. आयसीसीकडून डीआरएसच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे, प्रत्येक डावात सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांना डीआरएस अंतर्गत जास्तीत जास्त दोन रिव्ह्यूच्या संधी मिळतील. दोन्ही संघांच्या कर्णधारांना डावादरम्यान दोन वेळा मैदानावरील पंचाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार असेल. जर तिसऱ्या पंचाने आढावा घेतल्यानंतर निर्णय बदलला, तर डीआरएस अबाधित राहील. जर मैदानावरील पंचांचा निर्णय योग्य असेल तर आव्हान देणाऱ्या संघाला डीआरएम गमवावा लागेल. तसेच तर ‘अंपायर्स कॉल’ असा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिला, तरी रिव्ह्यू अबाधित राहिल.

गेल्या वर्षी जूनमध्ये आयसीसीच्या गव्हर्निंग कौन्सिलने जागतिक महामारी दरम्यान अनेक सामन्यांमध्ये अनुभवी पंचांची अनुपस्थिती लक्षात घेऊन क्रिकेटच्या तीनही प्रकारामध्ये अतिरिक्त रिव्ह्यू वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आयसीसीच्या या निर्णयानंतर, संघांना टी २० आणि एकदिवसीय सामन्यांच्या एका डावात दोन रिव्ह्यू आणि कसोटीच्या प्रत्येक डावात दोन्ही संघांना रिव्ह्यूच्या तीन संधी दिल्या जातात.

आयसीसीने विलंबित आणि पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यांसाठी किमान षटकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टी -२० विश्वचषकाच्या गट टप्प्यात, प्रत्येक संघाला डकवर्थ लुईस पद्धतीचा वापर करून निकाल निश्चित करण्यासाठी किमान पाच षटके फलंदाजी करावी लागेल. सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हाच नियम लागू आहे.

पण जर उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यामध्ये पावसामुळे व्यत्यय आला, तर षटकांची संख्याही वाढेल. मग प्रत्येक संघाला कमीतकमी १० षटके फलंदाजी करावी लागेल, जसे गेल्या वर्षी महिला टी २० विश्वचषकाच्या वेळी झाले होते. त्यावेळी सिडनीमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिला उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाल्याने या नियमाबद्दल बरीच चर्चा झाली. कारण तेव्हा राखीव दिवस नसल्यामुळे इंग्लंड स्पर्धेबाहेर झाला होता.

सन २०१८ मध्ये, आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धेत पहिल्यांदाच डीआरएस वापरला गेला. त्यानंतर महिला टी२० विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेला. तेव्हा संघांना फक्त एक रिव्ह्यू घेण्याची संधी होती. यानंतर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी -२० विश्वचषक स्पर्धेतही याचा वापर करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

एक सर्वात युवा, तर एक वयस्कर कर्णधार, पंत-धोनीच्या नावावर पहिल्या क्लालिफायरमध्ये झाले अनोखे विक्रम

भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी टॉम मूडी वॉर्नरला केले हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर?

दिल्ली वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---