मुंबई | ६ देशांच्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढत २२ आणि २५ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेला २२ जून रोजी सुरुवात होत असून ९ दिवस ही स्पर्धा सुरु रहाणार आहे.
पहिल्याच दिवशी पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत- पाकिस्तान हा सामना चाहत्यांना पहायला मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी स्टार स्पोर्ट्स हे ब्राॅडकास्ट पार्टनर आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, कोरीया, इराण, अर्जेंटीना आणि केनिया हे देश सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचे सर्व सामने अल वस्ल स्पोर्टस् क्लब, दुबई येथे होणार आहे. भारतात या सामन्यांचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर SS2, SS2 HD, SS1 Hindi, SS1 Hindi HD, SS1 Tamil सामन्यात होणार आहे.
दुबईमध्ये अनेक खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात. आता येथे कबड्डी खेळाचेही सामने होणार असल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
या स्पर्धेत होणार सामने रात्री ८ आणि ९ वाजता दाखवले जाणार आहेत.