भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा अलिकडच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हुड्डाने यावर्षी भारतासाठी टी-२० आणि एकदिवसीय प्रकारात पदार्पण केले. संघात संधी मिळल्यानंतर त्याने काही सामन्यांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. आयर्लंड दौऱ्यात त्याने टी-२० शतक ठोकले आणि स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. हुड्डाच्या रूपात भारतीय संघाला एक चांगला खेळाडू मिळाला असला, तरी संघात काही असे खेळाडू आहे, ज्यांची चिंता त्याने वाढवली आहे. आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांचे संघातील स्थान हुड्डामुळे भविष्यात धोक्यात येऊ शकते.
रविचंद्रन अश्विन –
या यादीत पहिले नाव रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आहे. अश्विनने काही महिन्यांनंतर भारताच्या टी-२० संघात पुनरागमन करायचे आहे. आगामी आशिया चषकात संघातील स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी अश्विनचा प्रयत्न असेल. परंतु, अष्टपैलू दीपक हुड्डा (Deepak Hooda) अश्विनची संघातील जागा बळकावू शकतो. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत हुड्डा आणि अश्विन दोघेही भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या तीन टी-२० सामन्यांमध्ये अश्विनने ६.६६ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीत मात्र त्याने अवघ्या २३ धाावंचे योगदान दिले आहे. दुसरीकडे तिसऱ्या टी-२० सामन्यात रविंद्र जडेजाच्या जागी दीपक हुड्डाला संधी दिली गेली. त्याने एका षटक टाकले आणि फक्त एक १ धाव दिली. मात्र त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याला गोलंदाजीसाठी बोलावले नाही.
रविंद्र जडेजा –
यादीत दुसरे नाव रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे आहे. जडेजा सध्या भारतीय संघासाठी वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत सहभागी आहे. मालिकेतील दोन सामन्यांमध्ये जडेजा खेळला, पण काही खास प्रदर्शन करू शकला नाही. दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ३ षटके गोलंदाजी केली आणि १६ धावा देऊन १ विकेट घेतली. फलंदाजी करताना त्याने २७ धावांची खेळी केली.
पहिल्या टी-२० सामन्यात जडेजाने १७ धावा केल्या होत्या आणि गोलंदाजीत १ विकेट मिळवली होती. त्याच्या अलिकडच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर तो फलंदाजीत अपयशी ठरताना दिसत आहे. अशात आगामी मालिकेत कर्णधार रोहित जडेजाच्या जागी हुड्डाला प्राधान्य देईल अशी शक्यता नाकारता येणार नाही.
अक्षर पटेल –
यादीतील तिसरे नाव अक्षर पटेल (Axar Patel) आहे. अक्षरला वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघात निवडले गेले आहे. मालिकेतील एका टी-२० सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. एकदिवसीय मालिकेत नेतृत्व करताना शिखर धवननेही त्याला संधी दिली होती, जिथे त्याने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद ६४ धावा करून भारताला विजय मिळवून दिलेला. परंतु गोलंदाजाच्या भूमिकेत त्याने फक्त २ विकेट्स घेतल्या होत्या.
असे असले तरी, पहिल्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अक्षर अपेक्षित फलंदाजी करू शकला नाही. हुड्डाने या मालिकेत एकूण ६० धावा केल्या होत्या आणि संघाला विजय देखील मिळवून दिला होता. अशात आगामी मालिकेत हुड्डा अक्षर पटेलसाठी देखील डोकेदुखी ठरू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी
टी-ट्वेंटी विश्वचषकातील पराभवाचा बदला इंडिया घेणार, खुद्द पाकिस्तानचा खेळाडूच म्हणतोय…
ईशान नको, ऋतुराज नको अन् नको रिषभ! ‘या’ खेळाडूला द्या ओपनिंगला संधी






