गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आहे.
याच भारतीय संघात असा एक खेळाडू आहे, ज्याच्या सततच्या खराब प्रदर्शनमुळे भारतीय संघात त्याचे स्थान जणू तळ्यात मळ्यातच सुरू आहे. अशा परिस्थितीत जर हा खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही, तर या खेळाडूला आपलं बस्तान गुंडाळायची वेळ येईल.
भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा खराब फॉर्ममुळे बऱ्याच दिवसांपासून कसोटी संघाबाहेर आहे. साहाच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या जागी यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला आजमावले गेले. यानंतर पंतने भारतीय संघासाठी उत्तम खेळाचे प्रदर्शन करून संघातील आपले स्थान पक्के केले आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत पंतला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे साहाला संघातील स्थान पक्के करायचे असेल तर त्याला या मालिकेत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करावं लागेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणे नियोजित आहे. अशा परिस्थितीत साहाने या मालिकेत चांगली कामगिरी केल्यास त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी दिली जाऊ शकते. साहाने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३८ सामन्यांमध्ये १२५१ धावा केल्या आहेत. या मालिकेत आणखी एक युवा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतलाही जागा देण्यात आली. अशा परिस्थितीत आता साहाकडून एकही चूक झाली तर भरतला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते.
दरम्यान कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजाच्या भागिदारीच्या जोरावर २५८ धावा फलकावर लावल्या आहेत. अय्यर दिवसाखेर ७५ धावांवर नाबाद राहिला. तर जडेजानेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताच्या अजून ६ विकेट्स बाकी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ पूर्वी केकेआरने घेतला मोठा निर्णय, मॉर्गनला मिळणार संघातून डच्चू?
चाहत्यापासून ते शिष्यापर्यंत..! हर्षल पटेलने शेअर केला महागुरू द्रविडसोबतचा जुना-नवा फोटो शेअर, पाहा
‘या’ प्रकरणी वॉनविरुद्ध बीबीसीची कठोर कारवाई, पण इंग्लंडच्या माजी कर्णधाराने आरोपांना म्हटले निराधार






