---Advertisement---

दुलीप ट्रॉफी फायनल: अखेरच्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी, पश्चिम विभागाचे कमबॅक

---Advertisement---

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील नव्या हंगामातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना बेंगलोर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघांकडे विजयाची संधी असेल. पश्चिम विभागाला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावण्यासाठी आणखी 116 धावांची गरज असून, दक्षिण विभागाला पाच बळी घेणे आवश्यक आहे.

सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण विभागाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. दक्षिण विभागाने तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर 7 बाद 181 धावा करताना 248 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा दक्षिण विभागाच्या उर्वरित फलंदाजांनी चिकाटीने फलंदाजी करत महत्त्वाच्या 49 धावा केल्या. त्यांचा दुसरा डाव 230 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पश्चिम विभागासमोर विजयासाठी 298 धावांचे आव्हान ठेवले.

पश्चिम विभागाची दुसऱ्या डावात खराब सुरुवात झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा सूर्यकुमार यादव व हार्दिक देसाई हे स्वस्तात तंबूत परतले. 79 धावांवर चार फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार प्रियंक पांचाल व सर्फराज खान यांनी 98 धावांची निर्णयाक भागीदारी केली. दिवसातील एक षटक बाकी असताना सर्फराज 48 धावा करून बाद झाला. प्रियांक 92 धावांवर नाबाद असून, पश्चिम विभागाला अखेरच्या दिवशी विजयासाठी आणखी 116 धावांची गरज आहे. पश्चिम विभाग सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेन.

(Duleep Trophy 2023 West Zone Need 116 On Last Day South Zone Need 5 Wickets Priyank Panchal There)

महत्वाच्या बातम्या –
BANvsIND Womens । टी-20 मालिकेची डोकेदुखी वनडेत नको! हरमनप्रीत कौरला चांगल्या खेळपट्टीची अपेक्षा
वर्ल्डकपमधून अर्शदीपचा पत्ता कट? बीसीसीआयच्या ‘या’ निर्णयाने उपस्थित झाला प्रश्न

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---