क्रिकेटटॉप बातम्या

चार महिन्यांनंतर मैदानावर परतलेला मुंबई इंडियन्सचा मॅच विनर सपशेल फ्लॉप, दिला सोपा झेल

Tilak Varma :- दुलीप ट्रॉफी 2024 च्या (Duleep Trophy 2024) दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. अनंतपूरच्या मैदानावर भारत अ विरुद्ध भारत ड संघात लढत सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघ पहिल्या दिवसाखेर 8 बाद 288 धावा अशा स्थितीत आहे. मयंक अगरवालच्या नेतृत्त्वाखालील भारत अ संघाच्या फलंदाजाना या डावात विशेष खेळी करता आल्या नाहीत. शम्स मुलानी (नाबाद 88 धावा) मात्र दिवसाखेर आपली विकेट वाचवून ठेवण्यात यशस्वी ठरला. दुसरीकडे भारत अ संघातील आणखी एका फलंदाजाची चर्चा झाली. हा खेळाडू 4 महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतला आणि वाईटरित्या बाद झाला.

मुंबई इंडियन्सचा मॅच विनर आणि भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्मा 33 चेंडूंचा सामना करताना केवळ 10 धावांवर बाद झाला. तिलक वर्माने आयपीएल 2024 नंतर प्रथमच क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले होते. परंतु 4 महिन्यांनंतर पुनरागमन करताना तो सपशेल फ्लॉप ठरला. फलंदाजीत तो विशेष काही करू शकला नाही. त्याचा झेल श्रेयस अय्यरने घेतला, ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

श्रेयस अय्यरने तिलक वर्माचा अप्रतिम झेल घेतला
खरे तर, 21 वर्षीय भारतीय फलंदाज तिलक वर्मा दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या फेरीत भारत अ संघाकडून सामना खेळण्यासाठी आला होता. या सामन्यात तिलक वर्माच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही आणि तो दुर्दैवाने श्रेयस अय्यरकरवी झेलबाद झाला.

भारत अ संघाच्या पहिल्या डावातील 18 व्या षटकात, तिलक वर्मा सरांश जैनच्या गोलंदाजीचा सामना करत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिलकने ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर असलेल्या चांगल्या लांबीच्या चेंडूवर आपली विकेट गमावली. तिलकच्या बॅटच्या बाहेरच्या काठाला लागलेला चेंडू थेट श्रेयस अय्यरच्या हातात गेला. अशप्रकारे अय्यरने त्याला अवघ्या 10 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

हेही वाचा – 

आधी मार खाल्ला, मग वचपा काढला; दुलीप ट्रॉफी सामन्यादरम्यान रियान आणि अर्शदीपमध्ये खडाजंगी
INDvsBAN : कानपूरमध्ये कसोटी आयोजित करण्यावरुन बीसीसीआयला धमकी, बदलणार दुसऱ्या सामन्याचे ठिकाण?
अजब क्रिकेटपटू! वडील एका देशासाठी खेळले, जन्म दुसऱ्या देशात झाला, कसोटी पदार्पण तिसऱ्याच देशासाठी!

Related Articles