झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन डावाची सुरुवात करण्यासाठी आला, तेव्हा चाहत्यांचे लक्ष त्याने घातलेल्या जर्सीकडे गेले. ही जर्सी धवनची नसून शार्दुल ठाकुरची होती, पण खेळाडूचे नाव लपवून त्याने ती घातली. याचे कारण अद्याप कळाले नाहीये, पण चाहत्यांमध्ये त्याविषयी उत्सुकता मात्र मोठ्या प्रमाणात आहे. ही उत्सुकता लाईव्ह सामन्यातच पाहायला मिळाली.
भारतीय संघाचा हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचलेल्या चाहत्यांमध्ये धवनने या जर्सीविषयी आकर्षण तयार झाले होते. सामन्यादरम्यान एका चाहत्याच्या हातात पोस्टर पाहायला मिळाले की, “शिखर, मला तुझा शर्ट मिळेल का?” हा प्रसंग भारतीय संघ फलंदाजी करताना २७ व्या षटकात घडला. शिखर धवन (Shikhar Dhawan) त्यावेळी बाद झाला होता. केएल राहुल, ऋतुराज गायकवाड आणि आवेश खान यांच्यासोबत बसून सामन्याचा आनंद घेत असताना धवनचेही लक्ष्य या चाहत्याकडे गेले.
इशान किशन आणि शुबमन गिल यांनी यावेळी भारताचा डाव सांभाळला होता. चाहत्याने धवकडे मैदानात घातेलल्या शर्टची मागणी केल्यानंतर धवनने जे केले, ते पाहून सर्वजण हसू लागले. धवनने यावेळी सराव सत्रात वापरला जाणारा स्लिवलेस टी-शर्ट घातला होता. चाहत्याने हवेत पकडलेला तो पोस्टर पाहिल्यानंतर धवनही त्याच्या भावना आवरू शकला नाही. त्याने शर्ट काढण्याची ऍक्शन केली, पण पुन्हा निर्णय बदलला. त्याचा हा गमतीशीर अंदाज पाहिल्यानंतर मैदानात एकच हशा पिकला. या प्रसंगाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) August 22, 2022
दरम्यान, सामन्याचा विचार केला, केएल राहुलच्या नेतृत्वातील भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ५० षटकांमध्ये भारताने ८ विकेट्सच्या नुकसानावर २८९ धावा केल्या. शिखर धवन ६८ चेंडूत ४० धावांची खेळी करू शकला. तर युवा फलंदाज शुबमन गिलने ९७ चेंडूत १३० धावांचे सर्वात मोठे योगदान दिले. तसेच इशान किशनने ६१ चेंडूत ५० धावांची खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अरेरे! भारत पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेचाही प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर
‘त्याची उणीव जाणवणार नाही’, बुमराहच्या अनुपस्थितीबाबत माजी दिग्गजाचे मोठे विधान
आशिया चषकादरम्यान ‘हे’ भारतीय दिग्गज करतील हिंदी भाषिकांचे मनोरंजन, पाहा संपूर्ण यादी