कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यात भारताची स्टार धावपटू द्यूती चंदचाही समावेश आहे. तिलाही पुढिलवर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकच्या तयारीसाठी अर्थिक चणचण भासत आहे, त्याचमुळे तिने 2018 मध्ये खेरेदी केलेली बीएमडब्ल्यू 3 सीरीज कार विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही मोठ्या स्पर्धा होत नसल्याने खेळाडूंना प्रायोजकांची (स्पॉन्सर्स) कमी भासत आहे. द्यूतीलाही सध्या याचाच फटका बसत आहे.
तिने म्हटले आहे की ‘प्रशिक्षण आत्तापर्यंत तरी चांगले चालू आहे. मी येथे भुवनेश्वर येथे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी प्रशिक्षणासाठी अर्थिक अडचण नव्हती, कारण टोकियो ऑलिंपिकचे वेळापत्रक ठरलेले होते आणि आमच्या राज्य सरकारने माझा सन्मान केला होता. पण कोरोनो व्हायरसमुळे टोकियो ऑलिंपिक पुढे ढकलण्यात आले आणि दरम्यान प्रायोजकांकडून आलेला पैसा खर्च झाला.’
तसेच इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार द्यूती म्हणाली, ‘एशियन गेम्समधील माझ्या कामगिरीबद्दल ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडून मला तीन कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळाले होते. त्यानंतर मी ती कार विकत घेतली. त्या पैशावर मी माझे घर पण बांधले आणि बीएमडब्ल्यू कार खरेदी केली.”
‘माझ्याकडे इतर दोन कार आहेत, आणि माझ्या घरी तीन कारच्या पार्किंगसाठी जागा नसल्याने मला एक कार विकायची होती.’
दरम्यान, सरकारने तिला पुढील वर्षी होणा ऑलिंपिकच्या प्रशिक्षणासाठी 50 लाख रुपये मंजूर केले होते, परंतु प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ आणि इतर कारणांच्या पगारामुळे तिला दरमहा 5 लाख रुपये खर्च करावे लागतात.
तिने कार विकण्यासंबंधी सोशल मीडियावर पोस्टही केली होती परंतू नंतर तिने ती पोस्ट डिलिट केली.
ती म्हणाली, ‘मी माझे सर्व पैसे संपले आहेत. कोविड -19 या साथीच्या आजारामुळे टोकियो ऑलिंपिकच्या प्रशिक्षणासाठी प्रायोजक मिळवणे कठीण झाले आहे. टोकियो ऑलिंपिक जुलै 2021 मध्ये हलवण्यात आले आहे.’
‘माझा जर्मनीमधील फिटनेस खर्च आणि प्रशिक्षणासाठी मला पैशांची गरज आहे, त्यामुळे मी माझी महागडी कार विकायचा निर्णय घेतला आहे.’
ट्रेंडिंग घडामोडी –
त्याचे चुकिचे वागणे पाकिस्तानला भोवले व आम्हाला भारताने दणदणीत पराभूत केले
पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूने केली तुलना; सेहवागच्या त्रिशतकापेक्षा सचिनची ‘ती’ खेळ लाखपटीने भारी
तुमच्या संघाच्या जेवढ्या धावा आहेत तेवढ्या एकट्या कोहलीने केल्यात, जपून बोला