---Advertisement---

खरंच! ड्वेन ब्राव्हो होणार आयपीएल२०२० मधून बाहेर?, वाचा प्रशिक्षक काय म्हणाले

On: रविवार, ऑक्टोबर 18, 2020 7:38 PM
---Advertisement---

शनिवारी (१७ ऑक्टोबर) शारजाह येथे झालेल्या आयपीएल २०२० च्या ३४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे मध्येच बाहेर गेल्यामुळे चेन्नई संंघ चिंतेत पडला होता. त्यानंतर तो परत आला नाही.

त्यामुळे शेवटच्या २०व्या षटकात दिल्लीला १७ धावांची आवश्यकता असताना चेन्नईकडून गोलंदाजी करण्यासाठी रवींद्र जडेजाला यावे लागले. यादरम्यान अक्षर पटेलने ३ षटकार ठोकत विजय मिळवून दिला.

ब्राव्होच्या दुखापतीबद्दल माहिती देत प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने सांगितले की, “ब्राव्हो ग्रोईन (मांडीच्या) दुखापतीने ग्रस्त आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकादरम्यान तो गोलंदाजी करू शकला नाही. ब्राव्होला ठीक होण्यासाठी काही आठवडेही लागू शकतात.”

ब्राव्होची दुखापत चिंतेचा विषय

चेन्नई सुपर किंग्स संघाला पहिल्यांदाच स्पर्धेत कठीण परिस्थितींचा सामना करावा लागत आहे. अशामध्ये ब्राव्हो जेव्हापर्यंत पूर्णपणे ठीक होईल, तेव्हापर्यंत तो कदाचित इतर सामने खेळू शकणार नाही. तरीही याबाबतीत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

चेन्नईचा पुढील सामना सोमवारी (१९ ऑक्टोबर) अबू धाबी येथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून ब्राव्होऐवजी जडेजाने केली शेवटच्या षटकात गोलंदाजी, धोनीने सांगितले कारण

-धोनी-अंपायर वादावर हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने सोडले मौन, केले मोठे भाष्य

-चेन्नईविरुद्ध विजयाचा हिरो ठरलेल्या ‘गब्बर’चा सुपर भांगडा, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

-दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---