मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ इंडियन प्रीमिअर लीग इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. आयपीएल 2023 स्पर्धेत सीएसकेने पाचव्यांचा किताब पटकावत मुंबईच्या विजेतेपदाची बरोबरी केली. हे दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूनही ओळखळे जातात. या संघांचे माजी खेळाडू असलेले ड्वेन ब्रावो आणि कायरन पोलार्ड हे मागील काही दिवसांपूर्वी एकमेकांची खिल्ली उडवताना दिसले होते. अशात पुन्हा एकदा ब्रावोने पोलार्डला ट्रोल केले आहे. याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
खरं तर, आयपीएल 2022 हंगामानंतर वेस्ट इंडिज (West Indies) संघाच्या या दोन्ही दिग्गजांनी आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) गोलंदाजी आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) फलंदाजी प्रशिक्षक म्हणून फ्रँचायझींशी जोडले गेले होते.
मागील काही दिवसांपूर्वी ड्वेन ब्रावो याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो आणि पोलार्ड दिसत आहेत. या दरम्यान कायरन पोलार्ड याने ब्रावोला म्हटले की, “तुला माहिती नाही की, पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यावर कसे वाटते.”
https://www.instagram.com/reel/Ct2WxBpNUMn/?utm_source=ig_embed&ig_rid=b7a5e060-61f4-41fc-895c-7408466cc818
यानंतर ड्वेन ब्रावो याने सडेतोड प्रत्युत्तर देत म्हटले की, “होय, मला विश्वास आहे की, पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यावर कसे वाटते, हे मला माहिती नाही. मात्र, टी20 क्रिकेट प्रकाराचा चॅम्पियन मी आहे. तुला माहिती नाही की, पाच वेळा सीपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर कसे वाटते आणि हा यामध्ये दोन वेळा विश्वचषक जिंकणेही सामील आहे. तेव्हा आपण हा वादविवाद इथेच संपवूया.”
ब्रावोने पुढे लिहिले की, “होय, मला माहितीये की, तुझ्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत, पण मला अभिमान आहे की, माझा मित्र श्रीमंत आहे. मात्र, लक्षात ठेव मी श्रीमंत नाहीये.”
खरं तर, यापूर्वीही ब्रावो आणि पोलार्ड यांनी एकमेकांना आयपीएल ट्रॉफीवरून ट्रोल केले होते. पोलार्ड 2013, 2015, 2017, 2019, आणि 2020 या आयपीएल हंगामात ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा भाग होता. तसेच, ब्रावोने 2011, 2018, आणि 2021 या हंगामात ट्रॉफी जिंकणाऱ्या सीएसके संघाचे प्रतिनिधित्व केले होते. (dwayne bravo trolls cricketer kieron pollard over five ipl trophies as latter interrupts his training session)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघ कसा संपवणार 10 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा वनवास? विंडीजच्या दिग्गजाने सांगितला अनोखा फॉर्म्युला
सरफराजने केला होता चेतन शर्मांचा अपमान? आक्रमक सेलिब्रेशनबाबत धक्कादायक खुलासा, लगेच वाचा