---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी इंग्लंड संघाची घोषणा; आयपीएलमध्ये बंदी असलेल्या खेळाडूकडे कर्णधारपद

On: मंगळवार, डिसेंबर 30, 2025 1:19 PM
---Advertisement---

पुढील वर्षी फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी टीम इंडियाने आपला संघ आधीच जाहीर केला असून आता हळूहळू इतर संघांच्याही घोषणा होत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) टी20 वर्ल्ड कप 2026 साठी इंग्लंडचा संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या संघाची कमान हॅरी ब्रूककडे सोपवण्यात आली आहे. आयपीएलमधून दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेला हॅरी ब्रूक आता जागतिक स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

इंग्लंडचा हा संघ केवळ टी20 वर्ल्ड कपसाठीच नाही, तर श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठीही निवडण्यात आला आहे. मात्र, जोफ्रा आर्चर केवळ टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसेल, तर ब्रायडन कार्स फक्त श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत सहभागी होईल. संघात माजी कर्णधार जॉस बटलर, फिल सॉल्ट सारखे अनुभवी खेळाडू आहेत. तसेच विल जॅक्स आणि सॅम करन यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा समावेश गट ‘क’ मध्ये करण्यात आला आहे. या गटात इंग्लंडसोबत वेस्ट इंडीज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली हे संघ आहेत. इंग्लंड आपला पहिला सामना 8 फेब्रुवारी रोजी नेपाळविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. गटातील सर्वात कठीण आव्हान इंग्लंडला वेस्ट इंडीजकडून मिळण्याची शक्यता आहे, तर इतर संघ तुलनेने कमकुवत मानले जात आहेत.

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी इंग्लंडचा संघ:
हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बॅन्टन, जेकब बेथेल, जॉस बटलर, ब्रायडन कार्स, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, जोश टोंग आणि ल्यूक वुड.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---