भारत आणि पाकिस्तान संघातील क्रिकेट सामना नेहमीच जगभरातील प्रेक्षकांनी पर्वणी ठरतो. आता हे संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. मात्र पाकिस्तान बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष रमीझ राजा भारताविरुद्ध खेळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या कार्यकाळात आम्ही कधीही भारताकडे क्रिकेट खेळण्यासाठी विनंती केली नव्हती. जर भारताला आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे असेल, तर त्यांनी स्वत: पाकिस्तानात यावे. आपण त्यांच्या मागे धावण्याची गरज नसल्याचे मनी (Ehsan Mani) यांचे म्हणणे आहे.
एहसान मनी यांचे पूर्ण वक्तव्य
क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना मनी (Ehsan Mani Statement About INDvsPAK Series) म्हणाले की, “मी नेहमीच स्पष्टपणे म्हटले आहे की, जर भारतीय संघाला आमच्यासोबत खेळायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानात यावे. मी कधीही भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकांसाठी नकार दिला नव्हता. परंतु आमचाही आपला आत्मसन्मान आहे. आम्ही भारताच्या मागे का धावावे? आम्ही अजिबात असेल नाही केले पाहिजे. जेव्हा त्यांना खेळायचे असेल, तेव्हाच आम्हीही खेळू.”
रमीझ राजांचे प्रयत्न वायफळ
पाकिस्तान बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष (PCB Chairman) रमीझ राजा यांनी नुकताच ४ देशांमध्ये मालिका खेळवण्याचा प्रस्ताव आयसीसीला दिला होता, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानव्यतिरिक्त इतर २ मोठ्या देशांचा समावेश होता. परंतु आयसीसीने हा प्रस्ताव नामंजूर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रात ही मालिका बसवणे अवघड असल्याचे कारण आयसीसीने दिले होते.
भारत-पाकिस्तानमध्ये नाही होत आंतरराष्ट्रीय मालिका
वर्ष २०१२-१३ पासून भारत विरुद्ध पाकिस्तान संघात द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाहीय. याचवर्षी पाकिस्तानने शेवटचा भारतीय दौरा केला होता. या दौऱ्यात २ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली गेली होती. त्यानंतर राजनैतिक उतार-चढावांमुळे हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मालिका खेळत नाहीत. हे संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितला पहिल्यांदा भेटल्यावर काय होत्या भावना? तिलक वर्मा म्हणतोय, ‘गळाभेट घ्यायची होती आणि…’
चेन्नईविरुद्ध का खेळला नाही कायरन पोलार्ड? मोठे कारण आले समोर