काबुल। शुक्रवारी अफगाणिस्तानमध्ये पूर्व नांजरहार प्रांतातील जलालबाद येथे क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटात ८ जण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच ४५ जण जखमी झाले आहेत.
काल रात्री ११ वाजताच्या दरम्यान रमजान कप स्पर्धेत ही घटना घडली. यावेळी ही स्पर्धा पहाण्यासाठी अनेक प्रेक्षक उपस्थित होते.
याबद्दल नांजरहारचे प्रांतिक राज्यपाल अत्ताहुल्ला खोग्यानी यांनी माहीती दिली. तसेत ते म्हणाले, या स्फोटाचा तपास चालू आहे.
या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतलेली नाही, पण पूर्व अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि इस्लामिक राज्य गट सक्रिय आहे, खासकरुन नांजरहार प्रांतामध्ये.
याआधीही अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान असे हल्ले झाले आहेत. सप्टेंबर २०१७ मध्ये काबुल येथे क्रिकेट सामन्यादरम्यान इस्लामिक गटाने केलेल्या हल्ल्यात ३ जण मृत्युमुखी पडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-म्हणून आजच्या दोन्ही आयपीएल सामन्यांना आहे महत्त्व!
–या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके
–मुंबई नाही तर या दोन संघांनी आयपीएलमध्ये केली आहे षटकारांची बरसात
–धोनी-कोहलीबद्दल झाला आयपीएलमध्ये विलक्षण योगायोग…!!!






