मुंबई । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात आलिशा देवगावकर, सानिका भोगाडे, स्वरा काटकर, आकांक्षा अग्निहोत्री, चार्मी गोपीनाथ यांनी, तर मुलांच्या गटात अर्णव पापरकर, अनिरुद्ध नल्लापराजू, मनन नाथ या 8 खेळाडूंनी मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत आगेकूच केली.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत सानिका भोगाडेने तेलंगणाच्या आठव्या मानांकित सौम्या रोंडेचा 6-0, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. महाराष्ट्राच्या आकांक्षा अग्निहोत्रीने गुजरातच्या तिसऱ्या मानांकित चांदणी श्रीनिवासनचा 6-0, 6-1असा सहज पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
स्वरा काटकरने उत्तरप्रदेशच्या चौदाव्या मानांकित सासा कटियारचा 6-1, 6-1असा एकतर्फी पराभव केला. कर्नाटकाच्या चार्मी गोपीनाथने महाराष्ट्राच्या तेराव्या मानांकित कायरा चेतनानीचा 4-6, 6-2, 7-5असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.
मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर याने हरियाणाच्या तेराव्या मानांकित प्रणव तनेजाचा टायब्रेकमध्ये 6-7(5), 6-4, 6-0 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. तेलंगणाच्या अनिरुद्ध नल्लापराजूने कर्नाटकाच्या सोळाव्या मानांकित मुस्तफा राजाचा टायब्रेकमध्ये 3-6, 7-6(5), 6-1 असा पराभव केला. आसामच्या मनन नाथ याने तामिळनाडूच्या नवव्या मानांकित प्रणव रेथीनचे आव्हान 6-4, 6-2असे मोडीत काढले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 12वर्षाखालील मुली: श्रुती अहलावाट(हरियाणा)(1)वि.वि.सौमित्रा वर्मा(उत्तरप्रदेश)6-0, 6-0;आलिशा देवगावकर(महा)वि.वि.मैत्रेयी फोगट(चंदीगड)(15) 6-0, 6-0;इरा शहा(महा) (10)वि.वि.अनन्या भाटिया(गुजरात) 6-4, 6-0;सानिका भोगाडे(महा)वि.वि.सौम्या रोंडे(तेलंगणा)(8) 6-0, 6-3;आकांक्षा अग्निहोत्री(महा)वि.वि.चांदणी श्रीनिवासन(गुजरात)(3) 6-0, 6-1;चार्मी गोपीनाथ(कर्नाटक)वि.वि.कायरा चेतनानी(महा)(13)4-6, 6-2, 7-5; निराली पदनिया(तेलंगणा)(9)वि.वि.कनुमरी इकराजू(तेलंगणा)7-5, 2-6, 6-3;रिधी पोका(तेलंगणा)(7)वि.वि.संजना देवीनेनी(कर्नाटक)7-5, 6-4; स्वरा काटकर(महा)वि.वि.सासा कटियार(उत्तरप्रदेश)(14)6-1, 6-1;मलिष्का कुरामु(तेलंगणा)(4)वि.वि.प्राप्ती पाटील(महा)6-0, 6-1;
12वर्षाखालील मुले: धर्शन गलीवेट(तेलंगणा)वि.वि.स्मित पटेल(गुजरात)6-4, 6-0;ऋषी सादिशकुमार(तामिळनाडू)वि.वि.अर्णव मनराळ(पश्चिम बंगाल)6-3, 6-3;रोहन अगरवाल(पश्चिम बंगाल)(10)वि.वि. नील जोगळेकर(महा)6-0, 6-3;देबसीस साहू(पंजाब)(7)वि.वि.रुरीक रजीनी(कर्नाटक)6-3, 6-2;अनिरुद्ध नल्लापराजू(तेलंगणा)वि.वि.मुस्तफा राजा(कर्नाटक)(16)3-6, 7-6(5), 6-1;मनन नाथ(आसाम)वि.वि.प्रणव रेथीन(तामिळनाडू)(9)6-4, 6-2; केशव गोयल(पश्चिम बंगाल)वि.वि.आदित्य तलाठी(महा)6-1, 6-2; अर्णव पापरकर(महा)वि.वि.प्रणव तनेजा(हरियाणा)(13)6-7(5), 6-4, 6-0;मानस धामणे(महा)वि.वि.श्री प्रणव तम्मा(कर्नाटक)6-2, 6-3; काहीर वारिक(महा)वि.वि.सम्प्रीत शर्मा(चंदीगड)6-0, 6-2.