प्रमोशन फेरीत आठव्या क्रमांकावर असलेला नाशिक द्वारका डिफेंडर्स विरुद्ध रेलीगेशन फेरीतील पहिल्या क्रमांकावर राहिलेला रायगड मराठा मार्वेल्स यांच्यात एलिमीनेटर 2 चा सामना झाला. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. सामन्याच्या पहिल्या डु और डाय रेड मध्ये दोन्ही संघ 1-1 गुण मिळत संघाचा खात उघडला. नाशिक चा आकाश शिंदे विरुद्ध रायगड संघा कडून प्रशांत जाधव व रुतिक पाटील असा सामना सुरू होता. मात्र आकाश शिंदे ने अनुभवाच्या जोरावर चतुरस्त्र चढाया करत रायगड संघाला ऑल आऊट केले.
मध्यांतरा आधी नाशिक संघाने आणखी एक लोन रायगड संघावर पाडत 26-12 अशी मध्यांतरला आघाडी मिळवली होती. आकाश शिंदे ने स्पर्धेत पाचवा सुपर टेन पूर्ण केला. रायगड कडून रुतिक पाटील व प्रशांत जाधव चांगला प्रतिकार दिला पण त्यांच्या बचावफळी त्याना साथ दिली नाही. मध्यांतरा नंतर रायगड संघाने चांगला प्रतिकार देत नाशिक संघाला ऑल आऊट केले. आकाश शिंदेची पकड करत रायगड संघाने सामन्यात चुरस वाढवली.
सामन्यात शेवटची सहा मिनिटं शिल्लक असताना 29-32 अवघ्या तीन गुणांच्या पिछाडीवर रायगड संघ होता व नाशिक संघाचा एक खेळाडूंना शिल्लक होता. रायगड संघाला नाशिक संघावर लोन पडण्याची संधी होती मात्र नाशिक संघाच्या ईश्वर पठाडे ने बोनस प्लस 4 गुण मिळवत सामना एकतर्फी केला. त्यानंतर मात्र नाशिक संघाने सावध खेळ करत 44-36 असा विजय मिळवला. नाशिक कडून आकाश शिंदे ने 14 गुण मिळवले तर गणेश गीते व सिद्धांत संदनशिव ने प्रत्येकी 3 पकडी केल्या. रायगड कडून राज जंगम ने अष्टपैलू खेळी केली. (Eliminator 2 – Nashik Dwarka Defenders beat Baji, ending Raigad’s challenge.)
बेस्ट रेडर- आकाश शिंदे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
बेस्ट डिफेंडर- गणेश गीते, नाशिक द्वारका डिफेंडर्स
कबड्डी का कमाल- ईश्वर पठाडे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एलिमीनेटर 1 – टाय ब्रेकर नंतर पालघर काझीरंगा रहिनोसने अतिरिक्त वेळेत मारली बाजी, पुण्याचे आव्हान संपुष्टात
क्वालीफायर 2 – मुंबई शहर संघ मुंबई उपनगर संघावर पडला भारी