---Advertisement---

त्याने १ मिनिटे १८ सेंकदाने मोडला मॅरेथॉनचा विश्वविक्रम

---Advertisement---

केनियाच्या ऑलिंपिक मॅरेथॉन चॅम्पियन एलियड किपचोगने बर्लिन मॅरेथॉनमध्ये जागतिक विक्रम केला आहे. यावेळी त्याची पळण्याची अधिकृत वेळ २ तास १ मिनिट ३९ सेंकद असून त्याने १ मिनिटे १८ सेंकदाने डेनिस किमेटोचा विक्रम मोडला.

किमेटोने २०१४ला हा विक्रम केला होता. किपचोगने २०१६च्या रियो दी जानिरोमध्ये ५००० मीटरचे सुवर्णपदक पटकावले आहे.

मला आता शब्दच सुचत नाही आहे. जागतिक विक्रम मोडल्याचा मला खूप आनंद होत आहे, असे किपचोग म्हणाला.

या शर्यतीत त्याने संथ गतीने सुरूवात केली आणि नंतर गती धरत विल्सन किपसॅंग या महत्त्वाच्या प्रतिस्पर्धीला पिछाडीवर पाडले. ३० किमीचे अंतर किपचोगने १तास २६ मिनिटे ४५ सेंकदात पुर्ण केले होते.

२०१३च्या हॅमबर्गमध्ये पदार्पण करताना किपचोगने नंतर २०१४च्या शिकागो, बर्लिन (२०१५ आणि २०१७) तर लंडनचे (२०१५, २०१६ आणि २०१८) पळताना वर्ल्ड मॅरेथॉन मेजर स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

क्रिकेटनंतर श्रीसंतचा मोर्चा या टीव्ही शोकडे

किदांबी श्रीकांतचे खराब कामगिरींचे सत्र सुरूच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment