आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसीने सोमवारी (२८ डिसेंबर) दशकातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यानुसार या दशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा रिचल हायहो फ्लिंट पुरस्कार ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिसा पेरी हिला देण्यात आला आहे. याशिवाय तिला सर्वोत्तम महिला वनडे आणि टी२० क्रिकेटपटूचाही पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कारांसाठी खेळाडूंची १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० हा कालावधीतील कामगिरी लक्षात घेण्यात आली असून यासाठी चाहत्यांनी मते देखील लक्षात घेण्यात आली आहेत. त्यानुसार एलिसा पेरीला सर्वोत्तम खेळाडू म्हणून चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
एलिसा पेरीने या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४३४९ धावा केल्या आहेत. यात तिच्या वनडेत ६८.९७च्या सरासरीने केलेल्या २६२१ धावांचा आणि टी२०त ३०.३९च्या सरासरीने केलेल्या ११५५ धावांचा समावेश आहे. सोबतच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २१३ विकेट्स घेतल्या आहेत. यात वनडेतील ९८ विकेट्स आणि टी२० तील ८९ विकेट्सचा देखील समावेश आहे.
https://twitter.com/ICC/status/1343480620643717122?s=20
https://twitter.com/ICC/status/1343480520391467009?s=20
https://twitter.com/ICC/status/1343480343811268609?s=20
याव्यतिरिक्त १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० या कालावधीदरम्यान तिने आपल्या संघाला तब्बल चार टी२० विश्वचषक आणि एक वनडे विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाने २०१३ साली आयसीसी वनडे विश्वचषक पटकावला होता. त्यावेळी एलिसाने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती. याबरोबरच २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० या टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा ती भाग होती.
याव्यतिरिक्त आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम वनडे आणि टी२० महिला संघातही तिला स्थान मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ‘रनमशीन’ विराट कोहली ठरला आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर
दशकातील सर्वोत्तम आयसीसी महिला वनडे आणि टी२० संघ जाहीर, मितालीसह ‘या’ भारतीयांना मिळाले स्थान






