---Advertisement---

आहा कडकच ना! WPLमधील सर्वात सुंदर महिला आहे RCBची क्रिकेटर, इंस्टाग्रामवर ‘एवढे’ लाख लोक करतात फॉलो

Ellyse-Perry
---Advertisement---

स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सपाटून पराभवाचा सामना करत आहे. आरसीबीने स्पर्धेतील पहिले पाचही सामने गमावले आहेत. 13 मार्च रोजी आरसीबी संघाचा दिल्ली कॅपिटल्सकडून 6 विकेट्सने दारुण पराभव झाला. या पराभवानंतर आरसीबी गुणतालिकेत पुन्हा पाचव्या स्थानीच विराजमान झाली. मात्र, आरसीबी संघाच्या एका खेळाडूने तिच्या सुंदरतेने प्रत्येक क्रिकेटप्रेमीला दीवाना बनवले आहे. ही खेळाडू इतर कुणी नसून ऑस्ट्रेलियाची दिग्गज अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी आहे. पेरी डब्ल्यूपीएलमध्ये तिच्या कामगिरी आणि सुंदरतेमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

एलिस पेरीची सौंदर्यामध्ये अभिनेत्रींनाही टक्कर
खरं तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाची स्टार अष्टपैलू एलिस पेरी (Ellyse Perry) सुंदरतेसोबतच प्रतिभावान खेळाडूदेखील आहे. तिला मैदानावर मोठमोठे फटके मारण्याव्यतिरिक्त चाहते तिच्या सौंदर्यावरही फिदा होतात. तिला भारताची क्रश महिलाही म्हटले जाते. ती सौंदर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. सोशल मीडियावर तिचे 1.2 मिलियन म्हणजेच 12 लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.

https://www.instagram.com/p/CWZQgiZBfFa/?utm_source=ig_embed&ig_rid=f8b6c191-429b-48f6-b4f1-c02c9f97a7c5

https://www.instagram.com/p/B8N8a5QhrPz/?utm_source=ig_embed&ig_rid=9ba52caa-1083-47fa-b33a-f3bff683c40b

एलिस पेरी हिने ऑस्ट्रेलिया संघासाठी आतापर्यंत 250 हून अधिक सामने खेळले आहेत. तिने 10 कसोटी, 131 वनडे आणि 139 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान तिच्या बॅटमधून कसोटीत 752, वनडेत 3386 आणि टी20त 1535 धावा केल्या आहेत. कसोटीत आणि वनडेत तिने प्रत्येकी 2 शतकेही ठोकली आहेत. तसेच, कसोटी क्रिकेटमध्ये तिची सरासरी ही 75.20 आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना तिने सर्व क्रिकेट प्रकारात मिळून 300 हून अधिक विकेट्सही नावावर केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/Bt2twr4BJHs/?utm_source=ig_embed&ig_rid=8d8473d4-ef36-4b28-b089-fa3e819af158

डब्ल्यूपीएलमध्ये आतापर्यंत एलिस पेरीची कामगिरी
एलिस पेरी हिने दिल्ली संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 31 धावांची खेळी साकारली होती. तसेच, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तिने फक्त 13 धावा केल्या होत्या. गुजरात जायंट्सविरुद्ध तिने 32 धावा, तर यूपी वॉरियर्झविरुद्ध 52 धावा करत अर्धशतक पूर्ण केले होते. यासोबतच 13 मार्च रोजी दिल्लीविरुद्ध तिने 67 धावांची नाबाद खेळी साकारली होती. यामध्ये 4 चौकार आणि 5 षटकारांचाही समावेश होता.

आरसीबी संघाचा पुढील सामना बुधवारी (दि. 15 मार्च) नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर यूपी वॉरियर्झविरुद्ध खेळला जाणार आहे. (Ellyse Perry wpl most beautiful female cricketer in rcb team of smriti mandhana wpl 2023 read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भरतची जागा धोक्यात! गावसकरांना वाटतंय ‘या’ खेळाडूने खेळावी WTCची फायनल; म्हणाले, ‘त्याला विसरू नका’
WTCच्या फायनलचं तिकीट तर मिळवलं, पण ‘या’ 3 आव्हानांचा सामना कसा करणार टीम इंडिया?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---