वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावात महिला खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडताना दिसला. ऑस्ट्रेलियन महिला संघाचे सर्वात अनुभवी अष्टपैलू एलिस पेरी हिच्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने तब्बल 1 कोटी 70 लाखांची बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतले. याच संघात भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन व भारताची युवा रेणुका सिंग या सामील आहेत.
.@RCBTweets fans, make way for Australian all-rounder @EllysePerry 😃👌#WPLAuction pic.twitter.com/oyFz1NVEbD
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2023
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी अष्टपैलू म्हणून पेरीकडे पाहिले जाते. ती आक्रमक फटकेबाजीसह उत्कृष्ट मध्यमगती गोलंदाजी देखील करते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंधरा वर्षाचा अनुभव तिच्या पाठीशी आहे. त्यामुळे तिला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व आरसीबी यांच्यामध्ये मोठी लढत पाहायला मिळाली. मुंबईने अखेरीस माघार घेतल्याने आरसीबीने 1 कोटी 70 लाखांची बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतले.
आरसीबीने लिलावाच्या पहिल्याच राऊंडमध्ये बाजी मारत भारताची उपकर्णधर स्मृति मंधाना हिला 3 कोटी 40 लाखांच्या रकमेत आपल्या संघात सामील करून घेतले. तिच्यासोबतच न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन व सध्या भारताची सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेली रेणुका ठाकूर आरसीबीचा भाग असतील.
(Elysse Perry Goes To RCB In Whopping 1 Crore 70 Lakhs With Smriti Mandhana)