सिडनी। न्यूझीलंडकडून कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरल्यानंतर अनुभवी फलंदाज रॉस टेलर भावूक झाला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीला आकार देण्याचे श्रेय न्यूझीलंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मार्टिन क्रोला दिले आहे. त्याच्याबद्दल बोलताना टेलरला अश्रू आवरता आले नाहीत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 ते 6 जानेवारी दरम्यान पार पडला. या सामन्यादरम्यान टेलर न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या यादीत स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. टेलरच्या आता कसोटीमध्ये 99 सामन्यात 7174 धावा झाल्या आहेत. तर फ्लेंमिंगने कसोटीमध्ये 111 सामन्यात 7172 धावा केल्या आहेत.
हा मोठा पराक्रम केल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी टेलर उपस्थित होता. यावेळी त्याने त्याच्या कारकिर्दीत मार्गदर्शक म्हणून क्रो यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. यावेळी तो बोलताना भावनिक झाला होता. क्रो यांचे काही वर्षांपूर्वी 3 मार्च 2016ला कॅन्सरने निधन झाले होते.
An emotional @RossLTaylor after becoming our all-time Test runs record holder. Legend. 😌 #AUSvNZ #cricketnation pic.twitter.com/d25Wr66by3
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 7, 2020
टेलर म्हणाला, ‘माझे लक्ष्य एक कसोटी सामना खेळणे होते. मला वाटते की ही भावनिक वेळ आहे. माझे मार्गदर्शक मार्टिन क्रो यांनी माझ्यासाठी न्यूझीलंडचा कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचे लक्ष्य माझ्यासमोर ठेवले होते. खरं सांगायचे झाले तर मला त्यावर विश्वास नव्हता. पण तो जर इथे आत्ता असता तर मला आवडले असते.’
तसेच टेलर पुढे म्हणाला, ‘जेव्हा मी प्रथम न्यूझीलंडकडून कसोटी खेळलो, तेव्हा मी वनडे कारकीर्दीत चांगली कामगिरी केली होती आणि फक्त तीन-चार प्रथम श्रेणी शतके ठोकली होती आणि ट्वेंटी-20 ची नुकतीच सुरुवात झाली होती.’
‘मी नेहमीच विचार केला की मी चांगलो वनडे क्रिकेट खेळेल. पण मला कसोटी क्रिकेटची कारकिर्द इतकी चांगली होईल याची खात्री नव्हती. म्हणूनच मी युवा असताना एक चांगला खेळाडू होण्यासाठी मार्टिनची मदत घेतली.’
हे सर्व सांगताना टेलरला त्याचे अश्रू आवरता येत नव्हते. तसेच त्याचा आवजही कापत होता.
न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
7174 – रॉस टेलर
7172 – स्टेफन फ्लेमिंग
6453 – ब्रेंडन मॅक्यूलम
6379 – केन विलियम्सन
5444 – मार्टिन क्रो#म #मराठी #Cricket #AUSvNZ @RossLTaylor @Maha_Sports— Pranali Kodre (@Pranali_k18) January 6, 2020
त्याचबरोबर 35 वर्षीय टेलरने अजून पुढे काही दिवस खेळण्याची इच्छा असल्याचे सांगताना म्हटले की ‘मला अजूनही वाटते की मी या स्तरावर खेळायला पुरेसा चांगला आहे आणि अजूनही माझ्याकडे माझ्या संघाला, न्यूझीलंड क्रिकेट आणि युवा खेळाडूंना देण्यासाठी काहीतरी आहे.’
याबरबरोच त्याने असेही म्हटले की विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. तसेच त्याचा विक्रम केन विलियम्सन मोडू शकेल असा विश्वासही टेलरने व्यक्त केला.
पावसामुळे नाही तर या कारणामुळे खेळपट्टी झाली ओली!
वाचा👉https://t.co/EcEKhDIuZG👈#म #मराठी #Cricket #INDvSL— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
आज होणाऱ्या महाराष्ट्र केसरी 'किताबी' लढतीबद्दल सर्वकाही…
वाचा👉https://t.co/WO4Ckb1DbM👈#Kusti #maharashtrakesari #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 7, 2020