पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडणार होती. या मालिकेतील पहिला वनडे सामना १७ सप्टेंबर रोजी पार पडणार होता. परंतु सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी न्यूझीलंड संघाने ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड सरकारने दिलेल्या आदेशानंतर न्यूझीलंड संघाने हा निर्णय घेतला होता.या निर्णयानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डने देखील पाकिस्तान दौरा रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर माजी पाकिस्तानी कर्णधार आणि पीसीबीचे अध्यक्ष रमिज राजा यांनी पाकिस्तानी खेळाडूंना भावनिक आव्हान केले आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडचा महिला आणि पुरुष संघ पाकिस्तानचा दौरा करणार होता. हे दोन्ही संघ वनडे आणि टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानची वाट धरणार होते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी आणि खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान पीसीबीचे अध्यक्ष रमिज राजा देखील नाराज झाले आहेत.
पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा यांनी म्हटले की, “इंग्लंडने केलेल्या कृत्यामुळे आम्ही निराश आहोत. त्यांनी दिलेल्या शब्द मागे घेतला आहे, जेव्हा आम्हाला जास्त गरज होती. इंशाल्लाह आपण पुन्हा नव्याने उभे राहू. पाकिस्तान संघाने जगातील सर्वोत्कृष्ट संघ बनण्यासाठी कुठलाही बहाणा न देता खेळण्यासाठी तयार राहावे.”
Disappointed with England, pulling out of their commitment & failing a member of their Cricket fraternity when it needed it most. Survive we will inshallah. A wake up call for Pak team to become the best team in the world for teams to line up to play them without making excuses.
— Ramiz Raja (@iramizraja) September 20, 2021
इंग्लंडच्या महिला आणि पुरुष संघाला पाकिस्तान संघाविरुद्ध वनडे आणि टी -२० सामन्यांची मालिका खेळायची होती.पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पुरुष संघांमध्ये १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी टी -२० मालिका पार पडणार होती. या मालिकेला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी सराव मालिका म्हणून देखील पाहिले जात होते.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान महिला संघांमध्ये १७,१९ आणि २१ ऑक्टोबर रोजी ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार होती. यापूर्वी देखील न्यूझीलंड संघाने मालिका रद्द केल्यानंतर, रमीज राजा यांनी हा मुद्दा आयसीसी पर्यंत जाईल अशी प्रतिक्रिया दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीने डीआरएसची मागणी करताच फलंदाजाने धरली पॅव्हेलियनची वाट, पाहा व्हिडिओ
‘मिस्टर ३६०’ च्या नावे नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ गोलंदाजांनी डिविलियर्सला केलंय ‘गोल्डन डक’वर बाद
अरं काय रे हे आरसीबी! तब्बल ‘इतक्यांदा’ ओढवलीय १०० पेक्षा कमी धावांत बाद होण्याची नामुष्की