---Advertisement---

संघात नसलेला हा भारतीय गोलंदाज इंग्लंडमध्ये कसोटी जिंकावी म्हणुन करतोय जीवाचे रान

On: सोमवार, जून 25, 2018 4:35 PM
---Advertisement---

गेल्या एक वर्षापासून भारताच्या एकदिवसीय संघाचा अविभाज्य भाग बनलेला कुलदीप यादव कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी नविन योजना आखतोय.

आपल्या पहिल्याच इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेला कुलदीप यादव इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

तसेच त्याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समाविष्ट होण्याची देखील आशा आहे.

“हा माझा पहिलाच इंग्लंड दौरा आहे. भारतीय संघाची टी-20 आणि एकदिवसीय मालिका माझ्यासाठी महत्वाची आहे. तसेच 2019 चा एकदिवसीय विश्वचषक इंग्लंडमध्ये होत असल्याने या मालिकेस आणखी महत्व प्राप्त होत आहे.” असे कुलदीप पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

” या दौऱ्यात भारतीय संघ पहिल्यांदा मर्यादित षटकांचे सामने खेळणार असला तरी मी कसोटी क्रिकेटवर पण लक्ष केंद्रित करतोय. मी आता कसोटी सामन्यात कशी गोलंदाजी करावी यावर योजना आखतोय. इंग्लंडमधील खेळपट्ट्या थोड्याश्या संथ असल्याने मी सध्या त्यावर काम करत आहे.” कुलदीप पुढे म्हणाला.

या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ प्रथम टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना तेथिल वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळणार आहे.

यावर कुलदीप म्हणाला, ” कसोटी मालिकेसाठी एक महिन्याचा वेळ आहे. त्या काळात इंग्लडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेन. भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटीत चांगली कामगिरी करू शकत नाही असे नाही. हा माझा पहिला इंग्लंड दौरा असल्याने मला यामध्ये चांगली कामगिरी करायची आहे.”

कुलदीपने भारतासाठी खेळलेल्या 20 सामन्यात 39 बळी मिळवले आहेत. तर 8 टी-20 सामन्यात 12 बळी घेतले आहेत.

कुलदीप भारताकडू फक्त दोनच कसोटी सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 9 बळी घेतले आहेत.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण कराणाऱ्या कुलदीप यादवला आता कसोटी संघात आपली जागा पक्की करण्याचे वेध लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आपण जर आयपीएल फॅन असाल तर ही आहे आपल्यासाठी महत्त्वाची बातमी!

-टॉप ४: इंग्लंड विरुद्ध वनडेत ४ क्रमांकावर हे खेळाडू करु शकतात फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment