इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात पाचवा आणि मालिका निर्णायक सामना शुक्रवारी (१ जुलै) खेळला जात आहे. हा सामना एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे खेळला जात आहे. पाच सामन्याच्या या मालिकेमध्ये भारत २-१ने पुढे आहे. यामुळे दोन्ही संघ सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारतीय प्रणामवेळेनुसार दुपारी ३.०० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी २.३० वाजता नाणेफेक झाली असून इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
#TeamIndia Playing XI for the 5th Test Match
Live – https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/SdqMqtz1rg
— BCCI (@BCCI) July 1, 2022
England have won the toss and they are having a bowl in the all-important Edgbaston Test 🏏#ENGvIND | #WTC23 pic.twitter.com/bcwf3ZPOFW
— ICC (@ICC) July 1, 2022
एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर भारताची कामगिरी पाहता सामना जिंकणे अवघड आहे. येथे भारत इंग्लड विरुद्ध सात कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये यजमान संघ सहा सामने जिंकत वरचढ ठरला आहे. तर भारताला एक सामना अनिर्णीत राखण्यात यश आले आहे.
असे आहेत दोन्हीही संघ-
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन):
बेन स्टोक्स (कर्णधार), ऍलेक्स लीस, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टूअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
भारत (प्लेइंग इलेव्हन):
जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: नेटमध्ये विराटचा कसून सराव, द्रविडचा शॉट खेळत कोचला केलं अंचबित
एजबॅस्टन कसोटी: कर्णधार बदलले, प्रशिक्षक बदलले आता तर आयसीसीने नियमही बदलले
Fifth Test: भारताकडे १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी, तर इंग्लंडचा ब्रॉडही रचू शकतो इतिहास