इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला. संघाने मिळवलेल्या या विजयासोबतच मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना २५ ऑगस्टपासून लीड्सवर खेळला जाणार आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी चांंगली बातमी पुढे आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर फिट झाला आहे आणि तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल. भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्हर्चुअल पत्रकार परिषदेद्वारे शार्दुलच्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले की, दुसऱ्या कसोटी सामन्यातून दुखापतीमुळे माघार घेतलेला शार्दुल ठाकुर आता तंदुरुस्त झाला आहे. तो आता प्लेइंग इलेव्हन निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध आहे.
रहाणे म्हणाला की, “मागच्या सामन्यात दुखापतीमुळे सामन्यातून बाहेत झालेला शार्दुल ठाकुर तिसऱ्या सामन्यासाठी फिट आहे. तिसऱ्या सामन्यात निवड प्रक्रियेसाठी तो उपलब्ध आहे. त्याची निवड संघाचे काॅम्बिनेशन कसे असेल? याच्यावर अवलंबून आहे.” लाॅर्ड्स कसोटी सामन्यात मांसपेशींमध्ये ताण आल्यामुळे शार्दुलला बाहेर बसावे लागले होते. वेगवान गोलंदाज इशांत शर्माला त्याच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले होते.
रहाणे पुढे बोलताना म्हणाला, “भारतीय संघ मागील सामन्यातील विजयामुळे उत्साहित आहे. मात्र आता पुढच्या सामन्यावर लक्ष आहे. संघ या गोष्टीचा जास्त विचार करत नाही की, लीड्सवर खेळपट्टी कशी असेल? सर्वांचे लक्ष फक्त चांगले प्रदर्शन करण्यावर आहे. प्रत्येक खेळाडू त्याची सर्वश्रेष्ठ खेळी करण्याचा प्रयत्न करेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘उर्वशी उर्वशी’ गाण्यावर शिखर धवनचा बहिणींबरोबर धमाकेदार डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल