---Advertisement---

टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग ४ षटकार ठोकणाऱ्या कॅरेबियन खेळाडूचा सिडनी सिक्सर्सबरोबर पुन्हा करार

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 12:21 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पार्श्वभूमीवर अनेक देशातील क्रिकेट बोर्डांनी देखील आपल्या क्रिकेट स्पर्धा सुरू केल्या. आयपीएल नंतर जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय असलेली स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग. सर्वात प्रथम ही स्पर्धा २०११-१२ साली भरवण्यात आली होती. आगामी काळात या स्पर्धेचे १० वे हंगाम असणार आहे.

दरम्यान, बिग बॅश लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या सिडनी सिक्सर्सच्या ताफ्यातून एक बातमी समोर आली आहे. सिडनी सिक्सर्सने वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रॅटवैथला आणखी एका हंगामासाठी संघात सामील करून घेतले आहे. गतवर्षी सिडनी सिक्सर्सकडून खेळताना कार्लोसने १६ सामन्यांमध्ये १६ विकेट घेतल्या होत्या. ज्यामुळे कार्लोसने सिडनी सिक्सर्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कार्लोसचे सिडनी सिक्सर्ससाठी खेळताना हे तिसरे वर्ष असेल याच्या आधी ही तो ७ व्या हंगामात सिडनी सिक्सर्सचा भाग राहिला होता. सिडनी सिक्सर्सच्या या निर्णयानंतर याबाबत बोलताना कार्लोस म्हणाला, “या संघाने गतवर्षी ही स्पर्धा जिंकली होती. तसेच हा संघ बिग बॅश लीगमधला एक यशस्वी संघ आहे. त्यामुळे माझीही या संघात पुन्हा सामील होण्याची इच्छा होती.”

“जसजसे आपण मोठे होतो तसे, आपण कोठेतरी निश्चित असण्याची आपली इच्छा असते. आपल्या आवडत्या शहरात(सिडनी) पुन्हा येणे, तसेच एका उत्कृष्ट संघासोबत जोडले जाणे हे अत्यंत कमालीचे अनुभव देऊन जाते,” असेही तो म्हणाला.

दरम्यान, ३३ वर्षीय कार्लोस इंग्लंडमधील टी-२० ब्लास्टमध्ये ‘बर्मिंघम बियर’ या संघाकडून खेळतो, तर ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत कार्लोस मॅंचेस्टर ओरिजनल संघाचा कर्णधार आहे. आता लवकरच सुरू होणाऱ्या कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) जैमका थलैवाज संघाकडून खेळण्यासाठी कार्लोस तयारी करत आहे.

बिग बॅश लीग मधील सिडनी सिक्सरचा संघ –
मोजेस हेंड्रिक्स (कर्णधार), सीन एबॉट, कार्लोस ब्रॅथवेट, डॅनियल ख्रिश्चन, टॉम करन, बेन द्वारशुइस, जॅक एडवर्ड्स, मिकी एडवर्ड्स, डॅनियल ह्यूज, स्टीफन ओ’कीफ, हेडन केर, नॅथन लायन, बेन मॅनेंटी, जोश फिलिप, लॉईड पॉप, जॉर्डन सिल्क.

महत्त्वाच्या बातम्या –
“लोकं फक्त महत्वाच्या लोकांबद्दल बोलतात”, अजिंक्य रहाणेचे टीकाकारांना सडेतोड उत्तर
विश्वचषकात पाच शतके झळकावूनही आनंदी नव्हता रोहित, ‘हे’ होते कारण
“विराट अत्यंत भाग्यशाली कर्णधार, ज्याकडे असे उत्कृष्ट दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---