---Advertisement---

INDvENG। दोन्ही संघाच्या खेळाडूनी दुसऱ्या दिवशी का घातलेल्या निळ्या टोप्या? कारण ऐकून तुम्हालाही वाटेल हेवा

On: रविवार, जुलै 3, 2022 4:16 PM
Ind-v-Eng
---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध सध्या सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मजबूत पकड बनवली आहे. सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ४१६ धावा केल्यानंतर इंग्लंडचे फलंदाज खेळपट्टीवर आले. परंतु त्यांना अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. पावसामुळे दुसऱ्या दिवशी जास्त षटकांचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही संघात एक समान गोष्ट दिसली की, प्रत्येकाने निळ्या रंगाच्या टोप्या घातल्या होत्या.

इंग्लंडचा संघ पहिल्या दिवशी २७ षटकांमध्ये अवघ्या ८३ धावा करू शकला. यादरम्यान त्यांच्या महत्वाच्या ५ विकेट्सही गेल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघ इंग्लंडपेक्षा ३३२ धावांनी पुढे होता. जोनी बेयरस्टो (१२*) आणि कर्णधार बेन स्टोक्स (०*) खेळपट्टीवर कायम होते. पावसामुळे खेळ बाधीत झाला असला, तरी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व बनवले. खेळाडूंनी फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्येही त्यांची झाप पाडली.

दुसऱ्या दिवशी मैदानातील प्रत्येक खेळाडूने निळ्या रंगाची टोपी घातल्याचे पाहिले गेले. स्टॅन्डमधून सामन्याचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांपैकीही अनेकांनी अशा टोप्या घातल्या होत्या. दरम्यान, या टोपीचा संबंध इंग्लंडचे दिग्गज बॉब विलिस (Bob Willis) यांच्याशी होता. २०१९ मध्ये विलिसचे प्रोस्टेट कॅंसरमुळे  निधान झाले होते.

बॉब विलिस यांच्या निधानंतर या आजारावर उपचार आणि लोकांमध्ये जागरूकता बनवण्यासाठी बॉब विलिस फंड बनवला गेला. याच कारणास्तव या आजाराप्रती जागरूकता वाढवण्यासाठी खेळाडू आणि प्रेक्षकांनी बर्मिंघम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी या निळ्या रंगाच्या टोप्या घातल्या. तसेच सामन्यादरम्यान खेळाडू आणि प्रक्षकांनी विलिससाठी ४५ सेकंद श्रद्धांजलीही अर्पन केली.

https://twitter.com/englandcricket/status/1543169196820946945?s=20&t=FBS4fudVrBjDkpjheSeesQ

https://twitter.com/englandcricket/status/1543154763931459585?s=20&t=dybgX8Hm84Uv27j3OP3RMA

विलिसचने इंग्लंड संघ आणि क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाचा विचार केला, तर खूप मोठे आहे. त्यांनी इंग्लंड संघासाठी एकूण ९० कसोटी सामने खेळले. १९८२ ते १९८४ पर्यंत त्यांना संघाचे नेतृत्व देखील केले. विलिसने त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत एकूण ३२५ विकेट्स घेतल्या. १९८१ च्या ऍशेस मालिकेतीत त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन पाहिले गेले होते, जेव्हा त्यांनी मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ४३ धावा खर्च करून ८ विकेट्स घेतल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६० सामन्यात त्यांच्या नावापुढे ८० विकेट्सची नोंद आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रविंद्र जडेजाने काढला आयपीएलमधील राग? म्हणाला, ‘जे झाले, ते…’

पाचव्या कसोटीचा थरार सुरू असताना धोनीची इंग्लंडमध्ये एन्ट्री, खेळाडूंसोबत करणार सेलिब्रेशन?

तब्बल १९ वर्षे जुना विक्रम मोडल्याने विडींजच्या दिग्गजाने केले बुमराहचे अभिनंदन, ट्वीट करत लिहिले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---