---Advertisement---

आयपीएलचे चाहते लयंच वाढीव राव! भारताच्या कसोटी सामन्यातही करतायत मुंबई अन् आरसीबीची नामघोष

On: सोमवार, जुलै 4, 2022 8:00 AM
MI-RCB-FAns
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या बर्मिंघमच्या एजबेस्टन स्टेडियमवर कसोटी सामना रंगला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसी काही रोमांचक घडामोडी घडल्या. तिसऱ्या दिवशी सॅन्डमधून सामना पाहत असलेल्या दोन प्रक्षकांनी सर्वांचे लक्ष वेधले, कारण त्यांनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल संघांच्या जर्सी घातल्या होत्या.

भारतीय संघ मागच्या वर्षी २०२१ मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आला होता. मालिकेतील पहिले चार सामने चांगल्या प्रकारे पार पडले, पण पाचव्या सामन्यापूर्वी संघात कोरोनाचा शिरकाव झाला. याच कारणास्तव पाचवा आणि शेवटचा सामना रद्द केला गेला होता. आता हाच सामना १ जुलैपासून एजबेस्टनमध्ये खेळला जात आहे.

एजबेस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दोन चाहते आयपीएल फ्रँचाजझींच्या जर्सीमध्ये दिसले, त्यापैकी एक महिला आहे आणि एक पुरुष आहे. पुरुष चाहत्याने मुंंबई इंडियन्सची, तर जी महिला होती, तिने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची जर्सी घातली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. बेंगलोर संघाने यावर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले. परंतु मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन खूपच निराशाजन राहिले. त्यांनी खेळलेल्या १४ सामन्यांपैकी फक्त ४ सामने जिंकले.

दरम्यान, उभय संघात सध्या सुरू असलेल्या या पाचव्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. पहिल्याच चार विकेट्स स्वस्तात गमावल्यानंतर रिषभ पंत (१४६) आणि रवींद्र जडेजाच्या (१०४) शतकी खेळीमुळे संघ ४१६ ही मोठी धावसंख्या उभी करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गुंडाळला गेला. इंग्लंडसाठी यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोने (१०६) शतक ठोकले. पहिल्या डावात इंग्लंडसाठी दिग्गज जेम्स अँडरसनने ५ विकेट्स घेतल्या. भारतासाठी मोहम्मद सिराजने चार, तर जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

सिराजच्या झटक्याने इंग्लंडची धुळधान, भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी

विराटची स्लेजिंग टीम इंडियाला नडली? शाब्दिक चकमकीनंतर बेयरस्टोचे झंजावाती शतक

पीवायसी रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत सामुराईज, टायटन्स, निंजाज संघांचे विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---