इंग्लंड आणि भारत (ENGvsIND) यांच्यातील मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केला गेला होता. एजबस्टन येथे १ जुलैपासून सुरू झालेल्या या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. मालिकेतील पहिल्या चार सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) भारताचा कर्णधार होता, पण मालिकेतील पाचव्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नेतृत्व करत आहे. दरम्यान, विराट आणि इंग्लंडच्या यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांच्यात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शाब्दिक चकमक झाल्याचे पाहिले गेले होते. या वादानंतर बेयरस्टोने झंझावाती शतक ठोकले आहे.
बेयरस्टोने ११९ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. यामध्ये त्याने १४ चौकार आणि दोन षटकार फटकारले आहेत. तो सलग तीन कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा इंग्लंडचा १५वा खेळाडू ठरला आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्ध ट्रेंटब्रीज आणि हेडिंग्ले येथे झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये शतके केली आहेत.
AN ABSOLUTE MACHINE!! 💯
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/PvDtqO33fw
— England Cricket (@englandcricket) July 3, 2022
सामन्याच्या पहिल्या दिवशी विराटसहित भारताची वरची फळी स्वस्तात बाद झाली. परंतु रिषभ पंत (१४६) आणि रवींद्र जडेजा (१०४) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी इंग्लंडला संघ फलंदाजीसाठी आला. इंग्लंडच्या पहिल्या पाच विकेट्स अवघ्या ८३ धावांवर पडल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडलने २७ षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या ८५ धावा केल्या होत्या. बेयरस्टो आणि कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) खेळपट्टीवर अनुक्रमे १२ आणि शून्य धावांसह कायम होते.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट आणि बेयरस्टो एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बोलताना पाहिले गेले होते, परंतु तिसऱ्या दिवशी मात्र दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. विराटसोबत वाद झाला तेव्हा बेयरस्टो खेळपट्टीवर पूर्णपणे सेटही झाला नव्हता, पण मैदानातील वातावरण तापल्यानंतर बेयरस्टोने देखील ही गोष्ट मनावर घेतले आणि मोठी खेळी केली. दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार विराट मात्र मागच्या मोठ्या काळापासून ज्या पद्धतीने अपयशी ठरत आला आहे, तसाच स्वस्तात बाद झाला. पहिल्या डावात विराटने अवघ्या ११ धावा करून विकेट गमावली.
दरम्यान, बेयरस्टो अलिकडच्या काही काळापासून सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला आहे. भारताविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिका खेळला होती. या मालिकेत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट आणि बेयरस्टो या दोघांनी स्वतःच्या संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि मालिका देखील नावावर केली होती. आता भारताविरुद्धही बेयरस्टोने त्याचा हाच फॉर्म पुन्हा एकदा दाखवला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत सामुराईज, टायटन्स, निंजाज संघांचे विजय
महिला हॉकी विश्वचषक: इंग्लंड विरुद्ध टोकियो ऑलम्पिकमधील पराभवाचा बदला घेण्यास भारतीय संघ सज्ज