इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात पहिला वनडे सामना केनिंगटन, द ओव्हल स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने १० विकेट्सने विजय मिळवला आहे. हा सामना झाल्यानंतर आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीचा त्याला खूप फायदा झाला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीनुसार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ७.२ षटकामधील ३ षटके निर्धाव टाकली आहेत. यामध्ये त्याने २.५९च्या इकोनॉमी रेटने १९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आयसीसी क्रमवारीत ५ स्थानांनी झेप घेत हे पहिले स्थान पटकावले आहे. याआधी पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा ट्रेटं बोल्ट होता. त्याची आता दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बुमराहने नवीन चेंडूचा योग्य वापर करत जोस बटलर (Jos Buttler)) याच्या नेतृत्वाखालील संघाच्या नाकी नऊ आणले होते. त्याने जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रुट, लियाम लिविंगस्टोन, डेविड विले आणि ब्रडॉन कार्स यांना बाद केले होते. यांमधील रॉय, रुट आणि लिविंगस्टोन हे शुन्यावरच बाद झाले.
बुमराह वनडे बरोबरच आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने या महिन्याच्या सुरुवातीला एजबस्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या एका षटकात विश्वविक्रमी ३५ धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
View this post on Instagram
या क्रमवारीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा जोश हेझेलवूड चौथ्या आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान पाचव्या स्थानावर आहे.
बुमराह बरोबरच मोहम्मद शमी (Mohammed Shami) यानेदेखील आयसीसी वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याने ३ स्थानांनी उडी घेत २३वे स्थान गाठले आहे. त्याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या होत्या.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याने या सामन्यात नाबाद ३१ धावा केल्या होत्या. त्यालाही क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून तो १२व्या स्थानावर पोहोचला आहे. आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचं टेन्शन वाढलंय! आयसीसी विश्वचषक २०२३ मधून बाहेर होण्याची शक्यता
इंग्लंडला हरवून टीम इंडिया ठरलीये पाकिस्तानपेक्षा वरचढं, क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान
‘ऑऊट ऑफ फॉर्म’ असणाऱ्या रोहित शर्माने ठोकली सर्वाधिक अर्धशतके, वाचा काय आहे विक्रम





