भारत आणि इंग्लंड याच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. यानंतर मालिकेतील चौथा कसोटी सामना द ओव्हल स्टेडियमवर गुरुवारीपासून (२ स्पटेंबर) सुरू झाला आहे. सामन्यादरम्यान खेळपट्टीवर गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. दरम्यान सामन्यातील पहिल्या दिवशी भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला जीवनदान मिळाले होते. पंचांनी रहाणेला बाद घोषित केले होते. मात्र, कर्णधार विराट कोहलीच्या सांगण्यावरून रहाणेने डीआरएस घेतला आणि पंचांनी दिलेला निर्णय चुकिचा ठरला. त्याने घेतलेल्या डीआरएसमुळे रहाणेला जीवनदान मिळाले होते.
ही घटना चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी घडली, जेव्हा क्रिस वाोक्स भारताच्या फलंदाजीवेळी सामन्यातील ३२ वे षटक टाकत होता. क्रिस वोक्सच्या या षटकातील शेवटचा चेंडू रहाणेला चकवा देऊन पायाला लागला होता. त्यानंतर पंचांनी क्षणाचाही विलंब न करता अजिंक्यला बाद घोषित केले होते. अजिंक्यही आपण बाद झाल्याचे समजत पव्हेलियनकडे माघारी निघाला होता. मात्र मैदानाबाहेर जाण्याआधी तो एकदा कर्णधार विराटसोबत बोलला आणि विराटने त्याला डीआरएस घेण्याचा सल्ला दिला.
विराटने दिलेल्या सल्ल्यानंतर रहाणेने डीआरएस घेतला आणि चेंडू स्टंप्सच्या वरून जात असल्याचे त्यात दिसले. यामुळे पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. असे असले तरीही, रहाणेला मिळालेल्या या जीवनदानाचा त्याला पुरेपूर फायदा घेता आला नाही. त्याने केवळ १४ धावा केल्या आणि क्रेग ओव्हरटनच्या गोलंदाजीवर मोईन अलीच्या हातून झेलबाद झाला.
Rahane DRS oval test#AjinkyaRahane #Rahane #ENGvsIND pic.twitter.com/RZbkWjBCUy
— Shubham Sharma (@Shubham73106588) September 2, 2021
ओव्हलवरील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात वेगवान गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला केवळ १९१ धावांवर गुंडाळले होते. भारताने केलेल्या या १९१ धावांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि शार्दुल ठाकुरचे अर्धशतक सामील आहे.
इंग्लंडच्या फलंदाजीवेळी भारतीय गोलंदाजांनीही त्यांना चांगलेच हैराण केले आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केवळ १५ धावा देत २ विकेट्स मिळवल्या आहेत. तर उमेश यादनेही जो रूटच्या रुपात त्यांना मोठा झटका दिला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने १७ षटकांमध्ये ३ बाद ५३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
उमेशच्या जादुई चेंडूने उखाडलं इंग्लंडचं ‘मूळ’, बघा डोळ्यांचे पारणे फेडणारी विकेट
सामन्यादरम्यान शास्त्रींना झोप अनावर, कोणाला पत्ता लागू नये म्हणून लढवली भन्नाट शक्कल!! फोटो व्हायरल
मैदानातील कट्टर वैरींमध्ये ओव्हल कसोटीत दिसला ‘याराना’, कोहली-अँडरसनच्या फोटोंनी चर्चेला उधाण