इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभी केली. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी शतकी खेळी केल्यामुळे हे शक्य झाले. भारतीय संघाची वरची फळी स्वस्तात बाद झाल्यानंतर या दोघांनीच डाव सांभाळला आणि द्विशतकीय भागीदारी केली. शतक पूर्ण केल्यानंतर अष्टपैलू जडेच्या खास सेलिब्रेशन करताना दिसला.
रिषभ पंतने १११ चेंडूत १४६ धावा केल्या आणि पहिल्याच दिवशी त्याने विकेट गमावली. पंतच्या बॅटमधून १९ चौकार आणि ४ षटकार निघाले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ७ विकेट्सच्या नुकसानावर ३३८ धावा केल्या. पहिल्या दिवशी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ८३ धावा करून खेळपट्टीवर कायम होता आणि दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःचे शतक पूर्ण केले. जडेजाने १९४ चेंडूत १०४ धावा केल्या, ज्यामध्ये १३ चौकारांचा समावेश होता.
इंग्लंडविरुद्धच्या या शेवटच्या कसोटी सामन्यात शतक केल्यानंतर जडेजा खूपच उत्साहात दिसला. त्याने ज्या पद्धतीने शतक सेलिब्रेट केले, त्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. जडेजा त्याच्या बॅटला एखाद्या तलवारीप्रमाणे फिरवताना दिसत आहे. व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
Coldest moment so far🥶 pic.twitter.com/Pa9qBOz0wt
— 101 gram (@VishaI_18) July 2, 2022
दरम्यान, उभय संघातील या सामन्याच एंकदरीत विचार केला, तर रोहित शर्मा कोरोना पॉजिटिव्ह असल्यामुळे जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. कर्णधाराच्या रूपात बुमराहला नाणेफेक जिंकता आली आणि भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. पहिल्या दिवसी संघाची धावसंख्या तीनशे पार गेली होती, जी दुसऱ्या दिवशी चारशे धावांच्या पुढ गेली. भारतीय संघ ४१६ धावा करून सर्वबाद झाला.
इंग्लंडच्या दिग्गज वेगवान गोलंदाज नेहमीप्रमाणे या सामन्यात देखील भारतीय फलंदाजांवर भारी पडला. अँडरसनने सामन्याच्या पहिल्या डावात ५ खेळाडूंना तंबूत धाडले. पहिल्या दिवशी त्याने तीन, तर दुसऱ्या दिवशी दोन विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त मॅथ्यू पॉट्सने २, तर स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स आणि जो रुट यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आनंदाला उधाण! बुमराहच्या बेधुंद फटकेबाजीचा डगआऊटमध्ये जोरदार जल्लोष, प्रशिक्षकांची रिऍक्शन लक्षवेधी
बुमराहचा मार खाणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडचा कौतुक करणारा विक्रम, ठरला इंग्लंडचा दुसराच खेळाडू
बुमराहचा मार खाणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडचा कौतुक करणारा विक्रम, ठरला इंग्लंडचा दुसराच खेळाडू