---Advertisement---

इंग्लंडच्या गोलंदाजांचा पुजाराशी पंगा, चेंडू भिरकावत वटारले डोळे; पण प्रयत्न ठरले निरुपयोगी

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 12:13 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना लंडनच्या द ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या खेळानंतर भारतीय संघाने सामन्यामध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकामुळे संघाने सामन्यात पकड बनवायला सुरुवात केली आहे. या दोघांच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १५३ धावांची भागीदारी केली आहे. त्यांच्या या खेळीच्या जोरावर भारताने सध्या इंग्लंडवर १७१ धावांची आघाडी आहे.

दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी असाही प्रसंग आला, जेव्हा इंग्लंडच्या गोलंदाजांनी स्लेजिंगचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा इंग्लंडला काहीच फायदा झाला नाही.

झाले असे की, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगावन गोलंदाज क्रेग ओव्हर्टन भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीने हैराण झालेला दिसला. ओव्हर्टन भारताच्या फलंदाजीवेळी ४९ व्या षटकात गोलंदाजीला आला होता. त्याच्या षटकाच्या पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर चेतेश्वर पुजाराने दोन चौकार मारले आणि त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर चिडलेल्या ओव्हर्टनने टाकलेला चौथा चेंडू पुजाराने डिफेंस केला आणि चेंडू सरळ ओव्हर्टनच्या हातात गेला. ओव्हर्टनने तो चेंडू घेतला आणि पुजाराला फेकून मारण्याचा प्रयत्न केला.  मात्र, त्याने तो चेंडू फेकला नाही. पुजाराचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याने हा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने पुजाराकडे डोळे वटारुनही पाहिले. असे असले तरी पुजारावर त्याने केलेल्या या प्रयत्नाचा काहीच फरक जाणवला नाही. त्याने आपली खेळी पुढे चालू ठेवली आणि ६१ धावांचे योगदानही दिले.

सामन्यादरम्यान रोहित शर्मा हा संपूर्ण प्रकार खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला उभा राहून पाहत होता. सामन्यादरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहे आणि याची सर्वत्र चर्चा होत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

https://twitter.com/kirrrtis_/status/1434150335178686473?s=20

सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने त्यांच्या दुसऱ्या डावात इंग्लंवर १७१ धावांची आघाडी मिळवली आहे. संघाकडे आणखी ७ विकेट्स शिल्लक आहेत. सध्या कर्णधार विराट कोहली (२२) आणि रविंद्र जडेजा (९) खेळपट्टीवर फलंदाजीसाठी उपस्थित आहेत. मालिकेत दोन्हा संघा १-१ अशा बरोबरीवर आहेत. चौथ्या कसोटी सामन्यात जो संघ जिंकेल तो मालिकेतही २-१ अशी आघाडी घेणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शांत अन् संयमी नव्हे ओव्हलवरील खेळीत दिसला पुजाराचा ‘रुद्रावतार’, मोईनला शिकवला धडा!

भारताची भक्कम भिंत…! पाय मुरगळला, तरीही पट्टी बांधून ‘लढवय्या पुजारा’चे अर्धशतक- Video

‘हा उदय सर्वांना पुरुन उरणारा’, ओव्हलवरील शतकानंतर रोहितचे जुने ट्वीट व्हायरल; चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---