भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून (बुधवारी) सुरू झाला आहे. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारतीय संघाची अवस्था बिकट केली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांचा टिकाव लागला नाही. भारतीय संघ केवळ ७८ धावांवर सर्वबाद झाला. भारताचा कर्णधार विराट कोहली या सामन्यातही काही कमाल करू शकला नाही. दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या चाहत्यांकडून भारतीय संघाला चुकीची वागणूक भेटल्याचे दिसले आहे. कोहली बाद झाल्यावर मैदानातील प्रेक्षकांनी निंदनीय कृत्य केले आहे.
भारतीय कर्णधार कोहली मागच्या काही काळापासून खराब फाॅर्मशी झगडत आहे. तो याआधीच्या कसोटी सामन्यांप्रमानेच या तिसऱ्या सामन्यातही काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात केवळ ७ धावा केल्या आहेत. त्याला पुन्हा एकदा जेम्स अंडरसनने बाद केले आहे.
जेव्हा अंडरसनच्या चेंडूवर कोहली बाद झाला. त्यानंतर तो चिडलेला दिसला. या दोघांमध्ये पूर्ण मालिकेदरम्यान संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अंडरसनने कोहलीच्या घेतलेल्या विकेटला विशेष महत्व प्राप्त झाले. बाद झाल्यावर विराट जेव्हा पव्हेलियनमध्ये परत जात होता, तेव्हा विराटची मान खाली झुकलेली होती. यावेळी इंग्लंडच्या चाहत्या बार्मी आर्मीने विराटला चिडवण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी ‘विराट जय हो’ (cheerio virat) असे म्हणत बाय-बायचा इशारा केला आणि विराटला चिडवण्याचा प्रयत्न केला. विराटने त्यांच्या या कृत्यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही आणि शांत पव्हेलियमध्ये परतला.
Cheerio Virat ????
Jimmy has 3 in the first hour ????#ENGvIND pic.twitter.com/OSM9jBe4DS
— England's Barmy Army ???????????????????????????????? (@TheBarmyArmy) August 25, 2021
इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना १५१ धावांनी जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, भारतीय संघाच्या खराब सुरुवातीमुळे चांहत्यांची निराशा झाली असेल. तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने केवळ ४ धावांवर त्यांचे दोन महत्वाचे फलंदाज गमावले होते. कर्णधार विराट आणि उपकर्णधार रहाणेही काही कमाल करू शकले नाहीत.
सामन्याच्या पहिल्या दिवशी संघाचा सलामीवीर केएल राहुल त्याचे खाते न खोलता तंबूत परतला. त्यापाठोपाठ पुजाराने ९ चेंडूत १ धाव केली आणि तोही बाद झाला. मागच्या बऱ्याच काळापासून तो संघासाठी मोठी खेळी करू शकला नाही. त्यानंतर या सामन्यतही तो अपयशी ठरला आहे. कर्णधार कोहलीदेखील पुन्हा या सामन्यात अपयाशी ठरला आहे. जेम्स अंडरसनने त्याला केवळ ७ धावांवर बाद केले. अंडरसनने पहिल्या एक तासात ६ षटके फेकली, त्यात त्याने केवळ ६ धावा देत भारताचे ३ महत्वाचे विकेट घेतले. त्याने केलेल्या या ६ षटकांतील ३ षटकात त्याने एकही धाव दिली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत ७८ वर ऑल आऊट, चिंता नको! ही बातमी वाचून भारतीय चाहत्यांच्या जिवात जीव येईल






