इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्याचा तिसरा दिवस खूपच रोमांचक राहिला. कसोटी मालिकेतील पहिले चार सामने मागच्या वर्षी खेळले गेले असून शेवटचा सामना १ जुलैपासून बर्मिंघममध्ये खेळळा जात आहे. इंग्लंडने ८४ धावांवर ५ महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या आणि तिथून पुढे तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. पहिल्या डावात इंग्लंडची धावसंख्या दोनशे पार गेली. आजच्या दिवशी इंग्लंडने २२८ धावा केल्या. आणि दिवसा अखेरीस भारताने दुसऱ्या डावात १२५ धावा केल्या आणि सामन्यात २५७ धावांची आघाडी घेतली आहे.
इंग्लंड संघ अडचणीत असताना त्यांचा कर्णधार बेन स्टोक्स आणि यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांच्यात सहाव्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी झाली. स्टोक्स २५ धावा करून बाद झाला, पण बेयरस्टोने पुढे त्याचे शतक पूर्ण केले. त्याने एकूण १४० चेंडू खेळले, जामध्ये १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. बेयरस्टोव्यतिरिक्त इंग्लंडच्या एकही खेळाडूला अर्धशतकी खेळी करता आले नाही. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गुंडाळला गेला. दरम्यान, विराट आणि बेयरस्टो यांच्यातील वादा हादेखील तिसऱ्या दिवसीचा चर्चेचा विषय ठरला.
गोलंदाजांमध्ये तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj ) भारतासाठी जबरदस्त प्रदर्शन केले. सिराजला यापूर्वी १ विकेट मिळाली होती आणि तिसऱ्या दिवशी त्याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर यांनी तिसऱ्या दिवशी प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. इंग्लंड फलंदाजी करत असताना पावासमुळेही काही वेळ खेळ बाधीत झाला.
त्यानंतर भारतीय संघ जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला, तेव्हा सलामीवीर शुबमन गिल (४) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. हनुमा विहारी (११) आणि विराट कोहली (२०) यांनी मोठी खेळी करता आली नाही. भारताला तिसऱ्या दिवसा अखेरीस आपल्या दुसऱ्या डावाच्या ४५ षटकांच्या खेळात ३ बळी गमावत १२५ धावा करण्यास यश आले आहे. यावेळी भारतासाठी चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक ५० धावा केल्या आहेत. शिवाय रिषभ पंत सध्या ३० धावा करून खेळत आहे.
दरम्यान, उद्या या सामन्यातील चौथा दिवस खेळाला जाणार असून आत्तापर्यंत भारताकडे असणाऱ्या २५७ धावांच्या बढतीमध्ये आणखी वाढ करण्याचा प्रयत्न फंलंदाज करताना दिसतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘इंग्लंड सामना जिंकल्यास कोहली जबाबदार’, भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सांगितले
भारताच्या वेगवान गोलंदाजांनी रचलाय इतिहास, कसोटी मालिकेत पहिल्यांदाच घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
Video: बेयरस्टोला पवेलियनमध्ये धाडताच विराट झाला भलताच खूष, कॅमेरात कैद झाला क्षण