---Advertisement---

चौथ्या कसोटीतील इंग्लंडच्या दारुण पराभवानंतर संतापला माजी क्रिकेटर; म्हणाला, ‘लाज वाटते…’

On: बुधवार, सप्टेंबर 8, 2021 11:46 AM
Joe Root
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्या खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच चौथ्या सामन्यातील या विजयानंतर संघाने कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मायदेशात होणाऱ्या सततच्या पराजयानंतर इंग्लंडचा संघ टीकेचा धनी झाला आहे. इंग्लंड संघावर मोठमोठ्या दिग्गजांनी टीका केल्या आहेत.

इंग्लंडच्या संघावर दिग्गजांनी केल्या टीका
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असून मालिकेत इंग्लंड १-२ ने पिछाडीवर आहे. यानंतर दिग्गजांनी इंग्लंजच्या संघावर प्रश्न उपस्थित केले आहेत. इंग्लंडचे माजी खेळाडू निक काॅम्पटनने एक ट्विट करत इंग्लंडवर टीका काेली आहे.

“खूप छान भारतीय संघ, तुम्ही चांगली चिकाटी आणि वृत्ती दाखवली. माझा अंदाज चुकीचा ठरला. पण मला इंग्लंड संघाची लाज वाटते आहे. कारण मला वाटत होते की, इंग्लंड हा सामना अनिर्णीत करू शकत होता.”

तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वाॅननेही म्हटले आहे की, “इंग्लंडच्या कसोटी संघातील फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील कमतरता या आठवड्यात उघड झाल्या. त्यांचा सामना अशा संघासोबत होता, ज्यांना जिंकण्याच्या महत्वपूर्ण क्षणांचा अंदाज होता. पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, इंग्लंडला मदतीच्या वातावरणाची गरज आहे. ”

भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंजचे फलंदाज अपयशी
चौथ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी लंच ब्रेकनंतर भारतीय गोलंदाजांनी सामनाच पालटला. शार्दुल ठाकुरने इंग्लंडला पहिला झटका दिल्यानंतर लंचपूर्वी इंग्लंडने दोन विकेट्स गमावले होते आणि सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करत होते. मात्र, लंच ब्रेकनंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात वर्चस्व निर्माण केले.

बुमराह आणि जडेजाने इंग्लंडच्या गोलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही. महत्वाच्या क्षणी दोन्ही गोलंदाजांनी संघाला विकेट्स मिळवून दिल्या आणि सामन्यात विजय पक्का केला. बुमराह सामन्यात चांगल्या फार्ममध्ये दिसला आणि २ फलंदाजांना त्रिफळाचीत केले. जडेजानेही त्याच्या फिरकी गोलंदाजांच्या मदतीने २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर शार्दुल ठाकुरनेही कर्णधार जो रूटची महत्वाची विकेट घेतली. उमेश यादवने डावात सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमधून बाहेर, मग टी२० विश्वचषकात खेळणार का अष्टपैलू स्टोक्स? प्रशिक्षकांनी दिली माहिती

श्रीलंकेपुढे बलाढ्य दक्षिण आफ्रिका नतमस्तक, ७८ धावांनी तिसरा वनडे जिंकत मालिकेवरही कोरले नाव

कॅप्टन कोहली पुन्हा तोडणार लाखो चाहत्यांची मने? अश्विनच्या पाचव्या कसोटीतील स्थानाविषयी दिले संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---