इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ अशा आघाडीवर आहे. दोन्ही संघांमध्ये मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवार (१० सप्टेंबर) पासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फिट झाला आहे, असे सांगितले जात आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ शमी आणि इशांत शर्मा या दोघांशिवाय मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत केले. आता पाचव्या सामन्यापूर्वी बुधवारच्या सराव सत्रात शमी आणि इशांत शर्मा सहभागी झाले होते. त्यानंतर असे सांगितले जात आहे की ते पूर्णपणे फिट आहेत. इंशात किंवा शमी पाचव्या सामन्यासाठी संघात परतला तर मोहम्मद सिराजला बाकावर बसावे लागू शकते.
दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघात बदल होण्याचे संकेत दिले आहेत. गावसकर यांचे मत आहे की काहीही झाले तरी, शमीला संघात सामील केले गेले पाहिजे.
गावसकर यांनी चौथा कसोटी सामना संपल्यानंतर सोनर स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना म्हणाले, “शमी संघात यायला हवा. यात कसलीच शंका नाही. एकमात्र प्रश्न हा आहे की, सिराजच्या जागेवर शमी येतोय का? करण तो या सामन्यात एकदम वेगळा होता. त्यामुळे हीच एकमेव अशी जागा आहे, जेथे मला वाटते की संधी आहे. पण त्याला संघात यायचे आहे, यात कसलाच प्रश्न नाही.”
पाचव्या कसोटी सामन्यासाठी शमी फिट झाल्याचे दिसत आहे, पण रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्या दुखापतीचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. ते दोघे मेडिकल टीमच्या निदर्शनाखाली आहेत. रोहितला चौथ्या कोसोटीमध्ये गुडघ्याला दुखापत झाली होती. तसेच पुजारालाही फलंदाजी करताना घोट्याला दुखापत झाली होती.
चौथ्या कसोटीमध्ये दुसऱ्या डावात पुजाराने ६१ आणि रोहितने १२७ धावा केल्या होत्या. रोहित पाचव्या सामन्यासाठी फिट झाला नाही तर मयंक अगरवाल, अभिमन्यू ईश्वरण आणि पृथ्वी शाॅ यांच्यातील एकाला संधी मिळू शकते. पाचव्या सामन्यात पुजाराच्या अनुपस्थितीत सुर्यकुमार यादव किंवा हनुमा विहारी यांच्यातील एकाला संधी मिळू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या –
शिखरला भारताच्या टी२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर करण्याबद्दल मुख्य निवडकर्त्यांनी केला मोठा खुलासा
टी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; डू प्लेसिस, मलानला डच्चू