भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना कोरोनामूळे रद्द केला गेला आहे. मालिका भारत जिंकणार की बरोबरी होणार, या प्रश्नाचे उत्तर हा सामना खेळला गेला आसता तर नक्कीच मिळाले असते. मात्र, भारतीय संघातली सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा सामना रद्द केला.
या निर्णयानंतर बीसीसीआयने खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राथमिकता दिली आहे. त्यानंतर बीसीसीअया पाचव्या कसोटी सामना पुन्हा आयोजित करू इच्छित आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही स्वागत केले आहे.
ओल्ड ट्रेफर्ड कसोटी सामन्याच्या पुन्हा आयोजनाच्या बीसीसीआयने दिलेल्या प्रस्तावाचे गावसकरांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, “भारताने दौरा पूर्ण करण्यासाठी इंग्लंडने माघारी परतण्याची केलेली, ती मदत कधीच विसरली नाही पाहिजे. ज्या दौऱ्याला २००८ मध्ये २६-११ च्या मुंबई आतंकावादी हल्ल्यामुळे मध्येच थांबवले गेले होते.” सोनी स्पर्ट्स नेटवर्कशी बोलताना पुढे सांगितले की, “होय, मला वाटते हे योग्य पाऊल असेल. आपण हे विसरले नाही पाहिजे की, इंग्लंड संघ मालिका पूर्ण करण्यासाठी भारतात माघारी आला होता.”
इंग्लंड संघ २००८ मध्ये २६ नोव्हेंबरला भारताविरुद्ध कटकमध्ये एकदिवसीय सामना खेळत होता आणि त्याच दिवशी आतंकावाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यामुळे सात सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने रद्द करावे लागले होते. आंतंकवादी हल्ल्यानंतर इंग्लंडने तत्काळ मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ते नंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तो परतले होते आणि भारताने ही मालिका १-० ने जिंकली होती.
गावसकर यांनी या घटनंची आठवण सांगितली आहे. ते पुढे म्हणाले, “आपण त्यावेळचे इंग्लंडचे कर्णधार केविन पीटरसनचे योगदान विसरले नाही पाहिजे. जर त्यांनी त्यावेळी भारताचा दौरा पुन्हा करण्यासाठी नकार दिला असता, तर निश्चितच दौरा संपला असता. तो पीटरसनच आहे, ज्यानी संघाच्या अन्य सदस्यांनाही दौऱ्यावर येण्यासाठी तयार केले. केपीमुळेच आपल्याला चेन्नईमध्ये चांगला कसोटी सामना पाहायला मिळाला. भारतीय संघाने पाचव्या ३८० धावांचे लक्ष्य गाठले होते.”
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीला टी२० विश्वषकासाठी टीम इंडियाचा मेंटर बनवल्याबद्दल कपिल देव यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
असे ३ खेळाडू ज्यांना टी२० विश्वचषकांच्या सामन्यांत धोनी नक्की खेळवण्याचा प्रयत्न करेल
आयपीएल २०२० च्या यशस्वी आयोजनानंतर ३ वेळा कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव, कुठे झाला निष्काळजीपणा?






