---Advertisement---

ENGvsIND: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली काय-काय पाहावे लागत आहे? जर आज भारत हरला तर T20I च्या इतिहासात…

On: मंगळवार, जुलै 7, 2026 12:21 PM
---Advertisement---

जेव्हापासून श्रेयस अय्यरने भारताच्या टी २० संघाचे नेतृत्वपद स्विकारले आहे, तेव्हापासून संघाची कामगिरी निराशाजनक होत आहे. संघ सामने जिंकायचेच विसरला आहे. अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले असून संघाला अद्यापही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

अय्यरने आयर्लंड दौऱ्यात भारताचा टी २० कर्णधार म्हणून पदार्पण केले आणि ज्या संघाने भारताला याआधी कधी पराभूत केले नाही, त्यांच्याविरुद्ध भारताने दोन सामन्यांची मालिका ०-२ ने गमावली. सध्या भारत इंग्लंड दौऱ्यावर आहे. यामध्ये पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जाणार असून यामध्येही भारताला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

इंग्लंड दौऱ्यातील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला, तर दुसरा सामना यजमान संघाने जिंकला. आज (७ जुलै) इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा टी २० सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारताने गमावला, तर भारत एका लाजिरवाण्या विक्रमाचा भाग बनू शकतो.

हा तिसरा सामना नॉटिंगहॅम येथे खेळला जाणार आहे. अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताने हा सामना गमावला, तर टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडेल की भारत सलग पाच टी २० सामन्यात एकदाही जिंकला नाही.

नॉटिंगहॅममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकच टी २० सामना खेळला गेला आहे. २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात इंग्लंडने २१५ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ २० षटकांत ९ विकेट्स गमावत १९८ धावाच करू शकला होता. सूर्यकुमार यादवने केलेली ५५ चेंडूत ११७ धावांची खेळी व्यर्थ गेली होती. इंग्लंडने हा सामना १७ धावांची जिंकला होता. तेव्हा

आता अय्यर आणि संघ पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी आणि इतिहास बदलण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. ENG vs IND third t20 if Shreyas Iyer Under Captaincy Team India lost match then this happened in first time in T20I history)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---