इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. लाॅर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघ त्यांचा तिसरा सामना लीड्स स्टेडियमवर खेळणार आहे. २५ ऑगस्ट्पासून या सामन्याची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज माॅंटी पानेसर याने भारतीय संघाला लीड्सवर विजयाचा मंत्र दिला आहे.
त्याने सांगितले आहे, जर भारतीय संघाने इंग्लंडचा कर्णधार जो रूटची लवकर विकेट घेतली; तर ते हेडिंग्लेवरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवू शकतात. उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या जो रुटचे हेडिंग्ले हे ‘होम ग्राउंड’ आहे. पानेसरने सांगितले की, भारतीय गोलंदाज जर अशीच गोलंदाजी करत राहिले; तर भारतीय संघ सहज मालिका त्यांच्या नावे करू शकतो.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना इंग्लंडच्या माजी गोलंदाजाने सांगितल की, “हेडिंग्ले जो रूट आणि जाॅनी बेयरस्टो यांचे होम ग्राउंड आहे. भारताने लाॅर्ड्सवर अप्रतिम क्रिकेट खेळले आहे. मात्र, हेडिंग्लेमध्ये संघाला मोठे आव्हान मिळू शकते. जर भारत अशाच प्रकारे गोलंदाजी करत राहिला; तर ते मालिकेवर ताबा मिळवण्यात यशस्वी होतील. हेडिंग्ले कसोटी जिंकण्यासाठी भारत तेव्हाच सर्वांची निवड ठरेल; जेव्हा ते रूटला लवकर बाद करतील. सिराजने त्यांच्यासाठी सर्वात मोठे अंतर निर्माण केले आहे. सिराजने मालिकेत इंग्लंडसाठी अडचणी निर्माण केल्या आहेत. इंग्लंडच्या फलंदाजांना सिराजची गोलंदाजी ओळखण्यात अडचण होत आहे.”
माॅंटी पानेसरने पुढे सांगितले इंग्लंडच्या संघाला बेन स्टोक्सची गरज आहे. जर संघाला मालिकेत पुनरागमन करायचे आहे, तर त्यांना स्टोक्सला संघात घ्यावे लागेल. तो पुढे बोलताना म्हणाला, “जर इंग्लंडला मालिकेला वाचवायचे असेल तर त्यांना स्टोक्सची खुप गरज आहे. जो रूटला यावेळी बेन स्टोक्सची गरज आहे. इंग्लंड त्याला खूप मिस करत आहे. जर स्टोक्स संघात उपस्थित असता; तर स्थिती काही वेगळीच असती.”
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारताने मालिकेतील लाॅर्ड्सवरील दुसरा सामना १५१ धावांनी जिंकला होता. त्यानंतर संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडकडून ‘हे’ २ नवीन खेळाडू मैदानात उतरणार, कर्णधार रूटने दिले संकेत
वुडच्या बदली खेळाडूने भारतीयांची वाढवली धडधड! ‘या’ अप्रतिम कामगिरीने गाजवलंय लीड्सचं मैदान
विराटसेना अजून बळकट! दुखापतीवर मात करत ‘या’ खेळाडूचे पुनरागमन, रहाणेने दिली माहिती