इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्याच घासाला खडा लागला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला आणि न्यूझीलंडच्या पदरी मात्र निराशाच आली. या मालिकेच्या आधी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलेला जो रुट या सामन्यात चमकला आणि इंग्लंडच्या विजयात महत्वाचे योगदान दिले. सामनावीर ठरलेल्या रुटने या सामन्यातील प्रदर्शनानंतर माजी दिग्गज ऍलिस्टर कूकचा खास विक्रम मोडित काढला.
इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ 1st Test) यांच्यातील कसोटी मालिकेचा हा पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर २ जून रोजी सुरू झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने विजय मिळवला निकाल चाहत्यांसमोर आला. इंग्लंडच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रुट (Joe Root) या सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणारा फलंदाज ठरला. त्याने पहिल्या डावात ११ धावांवर विकेट गमावली होती. परंतु दुसऱ्या डावात मात्र १७० चेंडूत नाबाद ११५ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १२ चौकारांचा समावेश होता.
या अप्रतिम प्रदर्शनानंतर रुट इंग्लंडने विजय मिळवलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शतकी खेळी करणारा फलंदाज बनला आहे. रुटने आतापर्यंत १८ असे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने शतक केले आणि संघाला विजय देखील मिळाला. यापूर्वी ऍलिस्टर कूक (Alastair Cook) आणि जो रुट (Joe Root) यांनी प्रत्येकी १७ वेळा ही कामगिरी केली होती, पण आता रुट या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर कूक मात्र दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. यादीत इयान बेल (Ian Bell) तिसऱ्या क्रमांकावर आहे. इयान बेलने शतकी केळी केलेल्या १५ सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला विजय मिळला होता.
इंग्लंडने जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
१८ – जो रुट
१७ – ऍलिस्टर कूक
१५ – इयान बेल
दरम्यान, उभय संघातील या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. पहिल्या डावात न्यूझीलंड १३२, तर इंग्लंड संघ १४१ धावांवर गुंडाळला गेला. मात्र, दुसऱ्या डावात मात्र खेळाडूंनी बऱ्यापैकी प्रदर्शन केले. न्यूझीलंडचा दुसरा डाव २८५ धावांवर थांबला. यामध्ये डॅरेल मिचेलने १०८, तर टॉम ब्लन्डेलने ९६ धावा केल्या. शेवटच्या डावात इंग्लंडने हे लक्ष्य ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. यामध्ये जो रुटव्यतिरिक्त कर्णधार बेन स्टोक्सने ५४ धावांचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युवीला आठव्या वर्षी बोल्ड करणारा मुशीर मुंबईच्या टीममध्ये आलाय
स्टोक्सला वाढदिवशी नशिबाची साथ, क्लीन बोल्ड असूनही पंचांनी दिले जीवदान, नेमकं झालं तरी काय?
“जर गांगुलीने माझी साथ दिली नसती, तर त्याला कर्णधारपद सोडावे लागले असते”